INDIA NEWS

Press

अकोट शहरात गुंडांचे साम्राज्य, शासकीय अधिकारी व नागरिकांमध्ये दहशत..

Salim Khan 23 May 2025

नायब तहसीलदार सुधीर थेटे यांना शासकीय कार्यालयात घुसून जिवे मारण्याची धमकी एका वरली बहाद्दर पत्रकार ने दिली.. सदर घटना घडल्याचे तहसील कार्यालय..

अकोट शहरात गुंडांचे साम्राज्य, नागरिकांमध्ये दहशत..

नायब तहसीलदारासह सर्व अधिकारी भयभीत..

वरली बहाद्दर पत्रकाराला पोलिसांचे तथा सिटी न्यूज सुपरफास्ट चे संरक्षण..

अकोला जिल्ह्यातील एकमेव असलेल्या नामांकित सिटी न्यूज सुपरफास्ट दैनिकाच्या वरली बहाद्दर पत्रकारांने अकोट येथील नायब तहसीलदार सुधीर थेटे यांच्या शासकीय दालनात घुसून थेट जिवे मारण्याची धमकी दिली होती त्या संदर्भात थेटे यांनी वरली किंग असलेला सिटी न्यूज सुपरफास्ट चा अकोट विशेष प्रतिनिधी राजेश साळुंके याच्याविरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली शासकीय कामात अडथळा निर्माण करूनही राजेश साळुंके याच्यावर पोलिसांनी कठोर गुन्हे दाखल न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे त्यामुळे नायब तहसीलदार थेटे यांच्यासह सर्व अधिकारी वर्गातून पोलिसांविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे

नायब तहसीलदार सारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर दादागिरी करीत शासकीय कार्यालयात घुसून जिवे मारण्याची धमकी देण्याचा हा प्रकार सर्व अधिकारी मंडळींना जिव्हारी लागला तसेच या दैनिकाच्या संपादकाने अशा घातक प्रवृत्ती व देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या वरली बहाद्दर पत्रकारावर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता राजेश साळुंके याची पाठराखण करीत उलट नायब तहसीलदार थेटे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला थेटे यांचा स्वतःच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून सिटी न्यूज सुपरफास्ट चे संपादक व संपादकीय विभागातील स्वतःला हुशार समजून खंडणीच्या अनेक केसेस सुरू असणार्या मंडळीच्या दबावाला बळी न पडता सुधीर थेटे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच या गंभीर प्रकरणाच्या विरोधात थेटे यांच्या समर्थनार्थ अनेक महसूल संघटना मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वेगवेगळ्या संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना या वरली बहाद्दर पत्रकार व त्याला संरक्षण देणाऱ्या सर्व घटकांविरुद्ध निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे वृत्त आहे.

सोबतच या दैनिकाच्या संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी थेटे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव तंत्र वापरल्याची तक्रार सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या समक्ष निवेदनाद्वारे देणार असल्याचे अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे अशा घटनांमुळे अकोट विभागात शासकीय अधिकारी हे येण्यासाठी धजत नाहीत तात्काळ बदली करून आकोट सोडून जाण्याचा नियमित प्रयत्न करताना दिसतात यापुढे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांवर अशी वेळ येऊ नये म्हणून पूर्णपणे सुरक्षित राहून कर्तव्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे याकरिता या सर्व संघटना पुढाकार घेताना दिसत आहेत अशा दहशतीच्या वातावरणात शासकीय कार्यालयातील कामकाजावर सुद्धा खूप मोठा परिणाम होत असून गोरगरीब जनता मात्र यामध्ये होरपळ्या जात आहे त्यामुळे राजेश साळुंके सारख्या समाजविघातक Bombay police act -135 सह देशद्रोहाचे गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीला पोलीस प्रशासन व सिटी न्यूज सुपरफास्ट हे पाठीशी का घालत आहेत याचे मात्र सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे या वरली बहादरामुळे अकोला पोलीस व नामांकित असलेले सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट यांची सुद्धा प्रतिमा मलीन होत असल्याचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish