INDIA NEWS

Press

Breaking | उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का, 12 राज्यांच्या प्रमुखांचा शिंदेंना पाठींबा

महाराष्ट्रातील 40 आमदार, 12 खासदारांनी तर शिंदेंना पाठिंबा दिलाच आहे. आता देश पातळीवरही एकनाथ शिंदेंना 12 राज्यांतील प्रमुखांनी पाठींबा दिलाय. त्यामुळे आधीच पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह धोक्यात आलेल्या उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Ravi Raj

15 spt 2022

उद्धव ठाकरे

मुंबईः उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने मोठा धक्का दिला आहे. यावेळची घडामोड राष्ट्रीय पातळीवरील आहे. देशातील 12 राज्यांतील शिवसेना अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर केला आहे. दिल्ली, मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहारमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. देशभरातील शिवसेना नेत्यांची मंगळवारी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला विविध राज्यांतील शिवसेनेचे अध्यक्ष, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील 40 आमदार, 12 खासदारांनी तर शिंदेंना पाठिंबा दिलाच आहे. आता देश पातळीवरही एकनाथ शिंदेंना 12 राज्यांतील प्रमुखांनी पाठींबा दिलाय. त्यामुळे आधीच पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह धोक्यात आलेल्या उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish