INDIA NEWS

Press

मुंबई :“मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख…

देवेंद्र फडणवीस यांना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी दोन प्रमुख नेत्यांची नावं घेतली.

Ravi Raj

15 spt 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

असं असलं तरी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरण समोर येण्याच्या दोन दिवस आधीच फडणवीस यांनी आजही आपण उद्धव ठाकरेंना फोन करु शकतो असं विधान केलं होतं.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी हे विधान केलेलं.

फडणवीस यांनी सीएनएन न्यूज १८ च्या टाऊन हॉल या विशेष कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रश्नावर बोलताना हे वक्तव्य केलं.

“बीएमसीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिंदे गटासोबत लढणार आणि नेतृत्व करणार असं म्हणालात. राज ठाकरेंसोबतही तुमच्या चर्चा होत राहतात असं मी ऐकलं,” असं म्हणत पत्रकार आनंद नरसिम्हन यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला.

यावर उत्तर देताना फडणवीस यांनी थेट, “हो आमची मैत्री आहे आम्ही चर्चा करतो,” असं सांगितलं.

त्यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण हे दक्षिणेतील राजकारणापेक्षा वेगळं असल्याचं सांगितलं.

“मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला फार छान पत्रं लिहिलं होतं,” असंही फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे यांचं अभिनंदनपर पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish