मामा उडालाच! ३५ वर्षीय मामीचे भाच्यासोबत सूत जुळले; आधी लग्न केले मग सांगितले…
By Published: September 16, 2022 3:45 PM
दोघांच्याही कुटुंबीयांनी घरातीलच प्रकरण असल्याने दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्न करू नका असे सांगितले.
प्रेम आंधळे असते म्हणतात, परंतू कधी कधी ते नातेसंबंध देखील पाहत नाही. असाच एक प्रकार राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडला आहे. तरुण मामीचा भाच्यावर जीव जडला आणि नातेसंबंधांवर मोठा परिणाम झाला आहे.
भाचा अल्पवयीन होता, तो नेहमी मामाकडे येत-जात होता. या दरम्यान ३५ वर्षीय मामीचे आणि त्याचे सूत जुळले. मामाला जेव्हा हा प्रकार समजला तोवर खूप उशीर झाला होता. अखेर हे मामी-भाच्याचे प्रेमप्रकरण पोलीस ठाण्यात गेले. हे प्रकरण बीनासरचे आहे. मामाने पोलिसांत पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार त्याचे १० वर्षांपूर्वी नेशलच्या महिलेशी लग्न झाले होते. तिच्यापासून दोन मुलेदेखील आहेत. तर कारंगोला त्याची बहीण दिलेली आहे. तिचा मुलगा अल्पवयीन आहे. तो नेहमी घरी येत जात होता. यावेळी मामी आणि भाच्यात प्रेमसंबंध तयार झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वीच पत्नीने भाच्यासोबत रहायला जाणार असल्याचे मामा असलेल्या पतीला सांगितले. तसेच भाच्यासोबत लग्न केल्याचेही ती म्हणाली. यामुळे मामाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मामाने आपण पत्नीला घटस्फोट दिला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांनी केलेले लग्न हे कायदेशीर नाही.
दोघांच्याही कुटुंबीयांनी घरातीलच प्रकरण असल्याने दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्न करू नका असे सांगितले. तरीदेखील दोघेही एकत्र राहणार, संसार करण्यावर अडून राहिले. दोघेही एकत्र जगणार आणि मरणार असल्याचे मामीने स्पष्ट केले तसेच मामासोबत जाण्यास तिने नकार दिला. मामीचे वय ३५ वर्षे तर भाच्याचे वय १७ वर्षे आहे. यामुळे नातेसंबंध तर आहेत, पण कायदेशीर दृष्ट्या देखील हे लग्न योग्य नाहीय. यामुळे कुटुंबीयांसोबतच पोलीसही काय करावे या कोड्यात अडकले आहेत. गेल्यावर्षी बिहारमध्ये देखील असाच प्रकार घडला होता. तरुण मामीने भाच्यासोबत लग्न केले होते.