अकोट: आ.अमोल मिटकरी यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्या निकटवर्तीयाकडूनच गंभीर आरोप…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचे निकटवर्तीय शाम राऊत यांनी पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांनी सत्तेचा दुरुपयोग करून दहशतीचे वातावरण निर्माण करीत गावातील वातावरण सतत खराब केले आहे….
अकोला: महाराष्ट्रातील बेधडक कोणत्याही प्रश्नावर वाचा फोडणारे ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद चे आमदार अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील कुटासा गावातील मूळ रहिवासी आहेत मागील तीन वर्षापासून अमोल मिटकरी हे आमदार झाल्यापासून गावातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे त्याचप्रमाणे काही निवडणुकांमध्ये त्यांचा धोबीपछाड सुद्धा झालेला आहे. अमोल मिटकरी हे आमदार झाल्यापासून अनेक युवा कार्यकर्ते त्यांच्यासोबत सक्रिय असून त्यापैकीच त्यांचे अतिशय निकटवर्तीय समजल्या जाणारे त्यांचे राईट हॅन्ड श्याम राऊत यांनी मागील तीन वर्षापासून गावातील लोकांवर आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून दहशतीचे वातावरण निर्माण करीत सत्तेचा दुरुपयोग करून संपूर्ण गावातील वातावरण खराब केले आहे असे गंभीर स्वरूपाचे आरोप श्याम राऊत यांनी केले आहेत. त्यासोबतच गावातील प्रतिष्ठित व वरिष्ठ नेते विजयसिंह सोळंके यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून सतत झालेला अन्याय व आपल्याकडून नेहमी झालेला अपमान विजयसिंह सोळंके यांच्यावर केलेल्या खोट्या केसेस कार्यकर्त्याकडून त्यांना झालेला मानसिक त्रास असे अमोल मिटकरी आमदार झाल्यापासून गावातील संपूर्ण वातावरण दूषित होऊन सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा गंभीर आरोप शाम राऊत यांच्याकडून झालेला आहे. तसेच शाम राऊत यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या सांगण्यावरूनच व त्यांच्या निर्देशानुसार हे सर्व प्रकार गावांमध्ये झालेले आहेत. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून विरोधकांवर सर्व स्तरांवर सत्तेचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करणे कार्यकर्त्यावर दबाव आणणे असे अनेक प्रकारचे गंभीर आरोप श्याम राऊत यांनी केले आहेत व त्यासोबतच त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांचे प्रतिस्पर्धी असलेले विजयसिंह सोळंके यांची जाहीर माफी मागितली आहे व गावातील सर्व जनतेची माफी सुद्धा त्यांनी जाहीर पणे मागितली आहे. काही दिवसापूर्वी घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड व आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या आज पुन्हा श्याम राऊत यांच्या माध्यमातून आमदार अमोल मिटकरी यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असून आरोपामध्ये भरपूर तथ्य असल्याचे गावकऱ्यांकडून चर्चा होत आहे…