अकोट: अकोट नगर परिषद चे माजी सभापती जाकीर शाह रशीद शाह याने नोकरीचे आमिष देऊन लाखो रुपयाचा गंडा घालून फसवणूक..
अकोट नगरपरिषद चे माजी सभापती जाकीर शाह रशीद शाह यांनी शहरातील नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडा घालत फसवले आहे
mandve 2 Oct 2022
अकोट:अमीनपुरा अकोट येथील जाकीर शाह रशीद शाह(मेंबर) हा 2021 मध्ये अकोट मधील आसाम राज्यातील पडसाद उमटलेल्या दंगलीतील मुख्य आरोपी असलेला जामिनावर सध्या बाहेर आहे परंतु जाकीर शाह रशीद शाह हा अकोट शहरातील अनेक लोकांना नोकरीचे आमिष देऊन अनेक बेरोजगार युवकांची फसवणूक करीत आहे त्यामध्ये अनेक निराधार महिलांना सुद्धा वेगवेगळे आमिष देऊन लाखो रुपयांचा गंडा घातलेला आहे असे आरोप काही पीडित महिलांनी केले असून स्वतःचे मंगळसूत्र सहित सर्व दाग दागिने गहाण ठेवून जाकीर शाह रशीद शाह याला लाखो रुपये दिल्याची माहिती दिली आहे अकोट शहरातच नव्हे तर अमरावती मुंबई महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाकीर शाह रशीद शहा याची पाळेमुळे रोवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोट शहरातील एका युवकांनी तसे थेट आरोपच केले आहेत की जाकीरशाह रशीद शाह अनेक लोकांना पैशाने गंडवून माझी सुद्धा फसवणूक केली आहे त्या युवकाकडून अकोट शहरातील उच्चभ्रू वसाहती मधील अतिक्रमित असलेली जागा ही खाली करून देण्याची जबाबदारी व त्याची अंमलबजावणी जाकीरशाह व राजकीय नेते व संबंधित अधिकारी यांच्या मदतीने कोरोना काळात शहरांमध्ये संचारबंदी असताना सुद्धा करण्यात आली व त्याच व्यवहारातील ठरलेली रक्कम व्हिडिओ मधील संबंधित आरोप करणाऱ्या युवकाला मिळाले नाहीत असे अनेक आरोप व्हिडिओ मधील युवकांने केलेले आहेत. जाकीर शाह यांच्या मदतीने शहरातील कुठली अतिक्रमित जागा खाली करण्यात आली व यामागे कोणते राजकीय नेते व अधिकारी यांचा संबंध आहे व कशा प्रकारची मदत जाकीर शाह यांना मिळाली आहे अतिक्रमित असलेले निराधार लोकांना कुठे हलवण्यात आले आहे की त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .मागील दोन वर्षापासून अमरावतीमध्ये सुद्धा एका वरिष्ठ पत्रकार यांना फसवून जाकीर शाह यांनी नोकरी संदर्भात अनेक बेरोजगार युवकांना फसवणूक केली आहे याची नोंद सुद्धा खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अमरावती येथे आहे. अकोट नगर परिषद येथील अनेक खोळंबलेली कामे करून देण्याच्या नावावर सुद्धा शहरातील अनेक लोकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जाकीरशाह रशीद शाह यांनी अनेक लोकांना नोकरीचे आमिष देऊन फसवणूक केली आहे. त्यासोबतच दंगल मधील असलेला मुख्य आरोपी असूनही शहरातील प्रत्येक उत्सव असल्यास आरोपी जाकीर शाह याला शहरांमध्ये राहण्यास बंदी अकोट शहर पोलीस स्टेशन व अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे दाखल असून फौजदारी १४४ कलमा अंतर्गत केलेली आहे तरी जाकीर शाह रशीद शाह हा खुलेआम शहरांमध्ये अनेक लोकांना फसवून शहरातील कायदा व सुव्यवस्था हा पायदळी तुडवत आहे याबाबतीत जाकीरशाह रशीद शाह यांच्या विरोधात पीडित महिला व त्यासोबत अनेक बेरोजगारांची झालेली फसवणूक हे उपविभागीय अधिकारी अकोट, पोलीस स्टेशन अकोट शहर, पोलीस अधिक्षक अकोला व गुन्हे अन्वेषण क्राइम ब्रांच अकोला यांना पुढील दोन दिवसात सविस्तर तक्रारी देणार आहेत..