INDIA NEWS

Press

कोरोना

  • नरसिंग महाराज यात्रेला भव्य दिव्य स्वरूप.! सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

    Chanchal pitambarwale 5 December 2024

    https://youtu.be/SXQrusCcSoA?feature=shared

    अकोट मधील प्रख्यात असलेली नरसिंग महाराज यात्रा उत्सव ही वर्षानुवर्षे चालत असलेली परंपरा अविरत अशी कायम सुरू आहे या यात्रेला खूप महत्त्व असून दिवाळीच्या निमित्ताने माहेरी येणाऱ्या सर्व मुली, महिला विशेषता लहान मुलांना या यात्रेचे आकर्षण आहे वर्षभरापासून या यात्रेची आतुरतेने सर्व महिला मंडळी सोबतच लहान मुले सुद्धा वाट बघत असतात दिवाळीनंतर पंधरा दिवसातच सुरू होणारा हा महोत्सव एक महिना सात दिवस सतत सुरू असतो महाराष्ट्रातून अनेक भाविक नरसिंग महाराज यांच्या दर्शनाला येतात व यात्रेचा भरभरून आनंद घेतात

    https://youtu.be/z2SLoNVX_Wg?feature=shared

    यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक अनोखा संदेश देऊन जातात यात्रेकरूंच्या सुविधा करिता महिला पोलीस सह जवळपास 40 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे आजूबाजूच्या राज्यातून आलेले व्यवसायिक व यात्रेकरू यांनी समाधान व्यक्त केले आहे दिवसेंदिवस या यात्रेला खूप मोठे भव्य दिव्य स्वरूप येत असून पोलीस प्रशासन हे सज्ज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले..

  • हिवरखेड मधे सापडली चोरीची दुचाकी..पोलीस कर्मचारी धिरज साबळे यांचे सर्वत्र कौतुक..आरोपी सह दूचाकी तामगांव पोलीस स्टेशनच्या ताब्यात..

    parmeshwar hatole 14 june 2024

    दुचाकी चोरीमध्ये हिवरखेड पोलिसांनी पकडलेला आरोपी शेख जाकीर शेख जहाबाज

    हिवरखेड येथील ट्रॅफीक म मध्ये कर्तव्यावरअसलेले पोलीस कर्मचारी धिरज साबळे हे बस स्टॅडवर आपले कर्त्यव्य बजावत असतांना त्याना विना नबंर प्लेट ची गाडी बगिच्या मधील अफरोज खाॅन जाकीरखाॅन यांचे जवळ अकोट रोड वर चालवताना दिसली त्यांनी गाडी ऊभी करुन गाडीचे कागद पञे मागीतले असता वरील आरोपीने ऊडवा ऊडवीची ऊत्तरे दिली

    यावरुन पो काॅ धिरज साबळे यांनी आरोपीस हिवरखेड पोलीस स्टेशनला दुचाकी सह आरोपीला आणले असता पोलिसी चक्रे फिरवल्यानंतर गाडी चोरीची असल्याचे दिसून आले गाडीच्या चेसीस वरील नबंर वरुन माहीती घेतली असता ती बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे समजले यावरुन तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काटेल कोलद येथील अनिल गोविंद कूकडे यांची mh 28 be 3248 हि गाडी असून चोरट्यानी दिनांक 28/9/23 चोरी गेल्याचे पोलीस स्टेशन मधे एफ आय आर 0256 नोंद आहे

    तसेच त्याच गावातील भगवान काशिराम कूकडे यांची mh 28 ay 2274 क्रमांकाची दुचाकी सुद्धा 2 एप्रिलपासून चोरी गेलेली आहे. त्याचप्रमाणे आणखी एक पळशी झाशी येथील गोपाल वसंत वाघ यांची गाडी mh 28 ay 7193 क्रमाकाची गाडी त्यांचे घराजवळून चोरी गेल्याची तक्रार दाखल असून सोनाळा पोलीस स्टेशन अतर्गत सूद्दा अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या असून गाडी चोरीच्या घटनांमध्ये सदर आरोपी तर नाहीत ना?

    असा संशय बळवलेला असून मध्यप्रदेश सिमा लगत असुन गोधन चोरी अवैध धंद्यांचे माहेर घर असलेल्या हिवरखेडात पोलिसी खाक्या दाखवल्यास अशा बिना नंबरप्लेट खोट्या नंबर प्लेट लावून चोरी करणाऱ्या चोरांवर जरब बसू शकतो..
    हिवरखेड पोलीस स्टेशनला गवसलेली गाडी ट्रॅक्टरच्या आडून ऊभी केलेली होती चोरट्यानी वायरींगतोडून विना चावीने चोरून नेली..


    सदर प्रकरणी हिवरखेडला आरोपी पकडला होता यावेळी ठाणेदार गोंवीद पाडंव, दूय्यम ठाणेदार श्रीराम जाधव यांनी कार्यवाई करीत गाडी व आरोपीला तामगाव पोलीस गुन्हा दाखल असल्यामुळे तामगाव पोलीस स्टेशनला स्टेशनला वर्ग केला आहे…

  • पिकाला हमीभाव द्या! अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार..नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी संघर्ष संघटनेचा एल्गार..

    Balu patil 12 june 2024

    शेतकरी संघर्ष संघटना पदाधिकारी वाशिम

    सोयाबीन, कापूस व तुर पिकाला हमीभाव देण्याची मागणी
    शेतकरी संघर्ष संघटनेचे पंतप्रधानांना निवेदन
    ..
    वाशिम – सोयाबीन या कृषीपिकाला ८ हजार रुपये, कापुस पिकाला १० हजार रुपये व तुर पिकाला १२ हजार रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु वानखेडे यांच्या नेतृत्वात ११ जुन रोजी पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले..

    महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस व तूर हे मुख्य पिक असून अंदाजे ७५ टक्के क्षेत्रामध्ये शेतकरी हे पिक घेत आहेत. शेतकर्‍यांना या पिकासाठी उत्पादन खर्च खुप जास्त येत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा व खान्देश या भागात सोयाबीन, कापूस व तूर हे मुख्य पिक शेतकरी घेतात. गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन, कापूस व तूरीला मार्केटमध्ये खुप कमी बाजार भाव मिळत आहे. मात्र उत्पादन खर्च वाढत आहे.

    परिणामी शेतकरी खुप संकटात सापडला आहे. तसेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सोयाबीन या पिकाला कमीत कमी ८००० रुपये, कापूस या पिकाला १०००० रुपये व तूर या पिकाला १२००० रुपये हमी भाव देऊन शेतकरी हितासाठी जातीने लक्ष देऊन शेतकरी संघर्ष संघटनेकडून केलेली मागणी पूर्ण करावी अन्यथा शेतकरी हितासाठी संघटनेकडून आंदोलनाची पावले उचलण्यात येतील

    🔥तसेच🔥

    खरीप हंगाम पेरणीपुर्वी शेतकर्‍यांना भावांतर योजनेचा लाभ द्या अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सद्धा शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे..
    येत्या खरीप हंगामात पेरणीपुर्वी शेतकर्‍यांना भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली असून याबाबत ११ जुन रोजीच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु वानखेडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना सुद्धा मागण्यांचे निवेदन दिले ..

    महाराष्ट्र सरकारच्या १६ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी ४ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व तशी घोषणासुध्दा करण्यात आली होती. परंतु या निर्णयाचा लाभ आजतागायत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मिळाला नाही.

    सद्या खरीप हंगाम जवळ आला असल्यामुळे सरकारने कुठलीही अट न घालता सरसकट सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात तातडीने भावांतर योजनेचा निधी जमा करावा. अन्यथा शेतकरी हितासाठी शेतकरी संघर्ष संघटनेकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे..

  • अखेर जाकीर शाहने केला स्वतःच्याच भाच्याचा वापर ! घातक गैरकृत्य करण्याचे जाकीर शाहकडून प्रोत्साहन -बॅटरी चोरीचा व्यवसाय सुरू केल्याचा संशय..

    Salim Khan 24 may 2024

    सिकंदर शाह चा मामा कुख्यात आरोपी जाकीर शाह रशीद शाह

    कुख्यात असलेला आसाम दंगलचा मुख्य आरोपी जाकीर शाह रशीद शाह याची जळे मुळे बाहेर राज्यात सुद्धा पसरली आहेत ..अनेकांची फसवणूक करून उदरनिर्वाह करणारा जाकीर शाह ला आता स्वतःचे राहते घर विकून पोट भरावे लागत आहे परंतु चांगले कपड्यांचा शौकीन व राजकारणाची नशा असलेला जाकीर शाहला आता स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर राज्यात वास्तव्यात असलेला भाचा सिकंदर शाह इलियास शाह याला अकोट मध्ये वास्तव्यास ठेवून त्याच्याकडून गैरकायदेशीर व अवैधरित्या लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण होईल असे गैरकृत्य करण्याचे प्रोत्साहन मामा जाकीर शाह कडून मिळत असल्याचा संशय आहे.. सिकंदर शाह व त्याचा जावई एजाज शेख यांच्यावर आज अकोट शहर पोलीस स्टेशनला पुन्हा कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जाकीर शाहला दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी आता कोणताही पर्याय उरला नसल्याने या थराला जाण्यास भाग पडले आहे..चांगले कपडे घालण्याचा शोक व राजकारणाची नशा जाकीर शाहला अजून किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवणार आहे हे आता वेळच ठरवणार आहे ..जाकीर शाह करिता असे चुकीचे उद्योग करणे हे काही नवीन नाही मागील पार्श्वभूमी बघता अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात जाकीर शाह ने केलेली आहे.. या अगोदर अकोट शहरातील दोन महिलांची नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून पंधरा लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. त्यापैकी एका महिलेला पंकजा मुंडे चा भाऊ असल्याचे व अकोट शहर चे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांची बदली करून देण्यापासून तर अनेक पोलीस अधिकाऱ्यांची प्रमोशने केल्याचे सांगून गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवण्यास भाग पाडले.. तर दुसऱ्या महिलेची शेती विकून मानसिक दबाव तंत्राचा वापर करून 11 लाखाची फसवणूक केली..चांगले कपडे घालून नेता होण्याच्या नादात जाकीर शाह ने अनेक संसार उध्वस्त केले.. त्यामुळे त्याची धग जाकीर शाहच्या स्वतःच्या परिवारापर्यंत पोहोचलेली आहे..

    नाशिक मधील भाजपा महिला नेत्या मंगला भंडारी यांची सुद्धा लाखो रुपयांची फसवणूक जाकीर शाह यांने केली आहे.. तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अजूनही जाकीर शाह यांच्याकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत .. एवढ्यावरच जाकीर शाह हा थांबला नसून अमरावती मधील एका शिक्षकाकडून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे त्यामध्ये एका वरिष्ठ पत्रकाराला फसवण्याचा प्रयत्न सुद्धा जाकीर शाह यांने केला असून खोलापुरी गेट पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त अमरावती येथे चौकशीच्या फेऱ्यात पत्रकाराला अडकून टाकले होते परंतु पत्रकार हा वेळीच सावध झाल्याने त्या व्यवहारातून बाहेर पडला..जाकीर शाह हा महिलांची फसवणूक केलेल्या पैशाची परतफेड न करता परमनंट नियुक्त असलेल्या वकिलांच्या अमिषाला बळी पडून अटकपूर्व जामीन व नागपूर हायकोर्टातून गुन्हे संपवण्याचा प्रयत्न करीत आहे..परंतु जाकीर शाह हा स्वतःच्या नातेवाईकाकडून कितीही चतुर पणाने गुन्हे घडवून आणत असेल तरी आजन्म हे गुन्हेगारी वृत्ती त्याचा पिच्छा सोडणार नाही..स्वतः बरबाद झालेला जाकीर शाह आता स्वतःचाच भाचा सिकंदर शाह व त्याचा जावई एजाज शेख अहमद शेख यांच्या माध्यमातून कोणताही पर्याय नसल्याने पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रबळ प्रयत्न करीत आहे..अशा समाजविघातक प्रवृत्तीला आळा घालून तात्काळ जेरबंद करण्याची मागणी अनेक पीडित महिलांकडून होत आहे..जाकीर शाह सारख्या वाईट प्रवृत्तीला अकोट सारख्या संवेदनशील शहरात मोकाट सोडल्यास भविष्यात अजूनही अनेक लोकांची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती अनेक जानकारांकडून व्यक्त होत आहे..

  • गांधीग्राम: संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तिघांचे प्राण वाचवले – दीपक सदाफळे यांच्या संपूर्ण टीमचे जिल्हाभरातून कौतुक..

    RaviRaj 28 Sept 2023

    https://youtu.be/CRrzyBm_YJQ?feature=shared
    दीपक सदाफळे गणेश विसर्जन दरम्यान पूर्णा नदी पात्रात उभे राहून मार्गदर्शन करताना..

    गणेश विसर्जन दरम्यान पुर्णा नदीपात्रात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी  तीन जनांना जिवनदान दिले.

    ▶️ *आज 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी मा.अजित कुंभार सर* यांच्या आदेशाने निवासी उप-जिल्हाधिकारी मा.विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा.संदीप घुगे सर यांच्या सहकार्याने आज सकाळ पासुन गांधीग्राम येथे श्रीगणेश विसर्जन स्थळी आणी पुर्णानदीपात्रात संरक्षणासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख (जिवरक्षक) दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी अंकुश सदाफळे,मयुर सळेदार,ऋषिकेश तायडे,विष्णू केवट,मयुर कळसकार,आशिष गुगळे, कीशु तायडे,शेखर केवट, अश्वीण केवट,संकेत देशमुख, अर्जुन केवट,जितेंद्र केवट, हे आणी रेस्क्यु बोट सह शोध व बचाव साहीत्यासह एक रुग्णवाहिका आणी सर्च रेस्क्यु वाहन सोबत सज्ज होऊन चोखपणे सुरक्षा सेवा देत असताना दिवस भरात एकजण मुर्तीबुडवताना तर एक जण लहान पुलाजवळुन मोठ्या पुलाकडे धारेत पोहत असतांना तर तीसरा मोरीत घुसलेल्या अवस्थेत असताना धारेतील प्रवाहात लागुन पाण्यात वाहून जाताना एकुण तीन जनांना वेग वेगळ्या घटनेत वाचविले ही मोठी यशस्वी कामगीरी केल्याचे समाधान जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी व्यक्त केले..

    https://youtube.com/shorts/9g5-CGg86SI?feature=shared
    दीपक सदाफळे यांच्या टीमने रेस्क्यू करून तिघांना जीवदान दिले..

    रात्री उशीरा पर्यंत संरक्षणासाठी आमची सज्ज राहणार आहे.यामध्ये तहसीलदार अविनाश शिंदे साहेब, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब,नायब तहसीलदार राहुल डोंगरे साहेब आणी दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवानंद वानखडे साहेब  यांचे सहकार्य लाभले अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे…

en_USEnglish