अकोला : अखेर दहीहंडा फाटा ते गोपालखेड मार्गे अकोला रस्ता दुचाकी करिता तात्पुरती व्यवस्था किनखेड वाशियांकडून करण्यात आली..
शेख सलीम 8 NOV 2022
गांधीग्राम : गेल्या काही दिवसापासून अकोट अकोला या महामार्गावरील अतिशय संवेदनशील व मुख्य असलेला गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरचा पूल याला अचानक तडा गेल्याने मागील एक महिन्यापासून अकोट अकोला महामार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे आजूबाजूच्या व अकोट तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातून जोडणारा एकमेव रस्ता असलेला महामार्ग हा बंद असल्यामुळे अनेक लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे . गांधीग्राम च्या आसपास असलेले अनेक गावाचा संपर्क हा या फुलांमुळे तुटला असून वीस किलोमीटर अंतरावर असलेले अकोला शहर या पुलामुळे पन्नास किलोमीटर अंतर प्रवास करून या लोकांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. इमर्जन्सी ॲम्बुलन्स सुद्धा वेळेत अकोला पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेकांचे नाहक बळी सुद्धा गेले आहेत तसेच अकोट वरून अकोला जाण्या येण्याकरिता दुप्पट १३० रुपये तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहेत त्यासोबतच जास्तीचा वेळ सुद्धा जाण्याकरिता लागतो आहे. प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले किंवा पर्याय निघताना दिसत नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ वानखेडे, शेख सलीम खुदबी साहेब (उपसरपंच रेल) अनेक कार्यकर्त्यांसह किनखेड वाशियांकडून अथक परिश्रम घेऊन दहीहंडा फाटा ते गोपाळखेड मार्गे गांधीग्राम हा रस्ता सुरू करून तात्पुरती व्यवस्था म्हणून करण्यात आला आहे. प्रशासनाने दुचाकी करिता तात्पुरती ये जा करण्याची मुभा दिली असून मोठे व जड वाहनास अजून परवानगी देण्यात आली नाही परंतु असे असताना सुद्धा दि.7 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान रेल गावातील निखत अंजुम अनामत खान यांची गरोदर असलेल्या मुलीला तात्काळ कशाचीही पर्वा न करता स्वतःच्या गाडीने अकोला येथे मुनवर खान हॉस्पिटल येथे दाखल केले असून आता ती गरोदर महिला सुखरूप असून त्यांनी तात्काळ संकटकाळी मदतीला धावून येणारे व सर्व समाजाची व लोकांची निरंतर निस्वार्थ सेवा देत आलेले उपसरपंच शेख सलीम यांचे आभार मानले आहेत. सोबतच पर्यायी मार्ग किनखेड वासियांनी पुढाकार घेऊन सुरू केल्यामुळे अति आवश्यक असलेली आरोग्य सुविधा व आजूबाजूच्या सर्व गावातील मंडळींना पर्यायी मार्गामुळे तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. तसेच नोकरदार वर्गातून असलेला नाराजीचा सूर या पर्यायी रस्त्यामुळे थोडा कमी झाल्याचे दिसून येते.