रोहित, कोहली आणि राहुल भारतीय संघाबाहेर, बीसीसीआयने का निर्णय घेतला
T20 World Cup: हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे. कारण भारत पराभूत झाला असला तरी त्यांना इंग्लंडची एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे हा पराभव भारतीय चाहत्यांना चांगलाच झोंबला आहे. पण बीसीसीआयने देखील आता रोहित, विराट आणि राहुल यांना संघात स्थान दिलेले नाही, असं नेमकं काय घडलं आहे जाणून घ्या…
Raviraj 10 NOV 2022

अॅडलेड : भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पण आता भारतीय यापुढील सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार लोकेश राहुल आणि विराट कोहली यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे, तर भारतीय संघाचे कर्णधारपद आता हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे. कारण भारत पराभूत झाला असला तरी त्यांना इंग्लंडची एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे हा पराभव भारतीय चाहत्यांना चांगलाच झोंबला आहे. पण बीसीसीआयने देखील आता रोहित, विराट आणि राहुल यांना संघात स्थान दिलेले नाही.
भारतीय संघ हा विश्वचषक जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण तसे घडेल मात्र नाही. पण आता भारताच्या संघातील काही सामन्यांत विराट, रोहित आणि राहुल पाहायला मिळणार नाहीत. कारण विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणारा आहे. पण विश्वचषकापूर्वीच बीसीसीआयने न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर केला होता. या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर रोहित, विराट आणि राहुल यांना संघात स्थान दिलेले नाही. या खेळाडूंना विश्रांती द्यायची, असा बीसीसीआयचा प्लॅन होता. पण आता पराभवानंतर त्यांना डच्चू दिला, असे म्हटले जात आहे. पण एकंदरीत आता रोहित, विराट आणि राहुल हे न्यूझीलंडच्या दौऱ्यात संघाबाहेर असतील, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारतीय संघ नेमकी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पण सध्याच्या घडीला तर भारतीय संघाला ट्रोल केले जात आहे. कारण विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्यांना स्थान पटकावता आले नाही. त्याचबरोबर इंग्लंडची एकही विकेट त्यांना मिळवता आली नाही आणि त्यामुळेच हा पराभव भारतीय चाहत्यांना विसरता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण भारत पोहोचला नाही ही सल चाहत्यांच्या मनात नक्कीच असणार आहे.