अलिबाग: तहसीलदार मीनल दळवी यांना 200000 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक
Ravi Raj 11 Nov 2022
रायगड: अलिबाग येथील तक्रारदार यांच्या सासऱ्याचे आईने, सासर्याने बक्षीस पत्राने दिलेली जमिनीचे सासऱ्याचे नावे सातबारा नोंद होण्यासाठी आदेश देण्याकरिता व सासऱ्याचे भाऊ यांनी बक्षीस पत्रावर हरकत घेतलेल्या अपील प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांचे सासरे यांच्या बाजूने देण्याकरिता अलोसे श्रीमती मीनल कृष्णा दळवी वय 49 वर्ष तहसीलदार अलिबाग जिल्हा रायगड यांनी आरोपी व एजंट राकेश रमाकांत चव्हाण यांच्यामार्फत 500000 लाख रुपयाची लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 28/09/2022 रोजी एसीबी नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 29/09/2022 रोजीचे लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी एजंट राकेश रमाकांत चव्हाण यांनी स्वतःसाठी व अलोसे श्रीमती मीनल कृष्णा दळवी तहसीलदार यांच्याकरिता 300000 लाख रुपयांची रक्कम लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिनांक 11/ 11 /2022 रोजी लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी अलोसे श्रीमती मीनल कृष्णा दळवी यांनी वरील नमूद कामाकरिता 200000 रुपये लाचेची मागणी रक्कम आरोपी राकेश रमाकांत चव्हाण एजंट यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर लगेचच करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान आरोपी राकेश रमाकांत चव्हाण यांनी अलिबाग नगरपालिका इमारती समोरील आर के इलेक्ट्रॉनिक्स शॉप मध्ये तक्रारदार यांचे कडून 200000 लाख रुपये पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारले असता आरोपी राकेश रमाकांत चव्हाण यांना 17:48 वा. रंगीहात पकडण्यात आले आहे त्यानंतर अलोसे श्रीमती मीनल कृष्णा दळवी यांना त्यांचे राहते घराच्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील कार्यवाही मा. श्री सुनील लोखंडे सो. पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र व मा. श्री अनिल घेरडीकर सो. अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली .