INDIA NEWS

Press

अकोला: अखेर सर्वपक्षीय संघर्ष समिती गांधीग्राम यांच्या आंदोलनाला यश..

Raviraj 21 nov 202

गांधीग्राम : मागील दीड महिन्या पूर्वीपासून अकोट अकोला या महामार्गावर मध्यभागी असलेले गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरचा फुलाला तडे गेले असल्यामुळे अचानक पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली

त्यामुळे गांधीग्रामच्या आसपास असलेले जवळपास 100 गावांचा संपर्क अचानक तुटला असून अकोला हे जिल्ह्याचे ठिकाण सोबतच सर्व आरोग्य विषयक सरकारी हॉस्पिटल व जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या सेवा अकोला शहरांमध्ये असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच शेतातून कापूस वाहून नेण्याकरिता दोन किलोमीटर असलेले शेताचे अंतर हे 25 किलोमीटर जास्तीचे झाल्यामुळे व कापूस विकण्याकरिता अकोट ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे कापूस बाजारात नेण्याकरिता जास्तीचा वेळ व पैसा खर्च होत असल्याने शेतकरी वर्गातून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत होती. शाळकरी मुले यांनासुद्धा या पुलामुळे कोणतेही वाहन जात नसल्याने दोन किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत आहे व म्हातारे वयोवृद्ध लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या असताना देखील प्रशासनाबद्दल भयंकर राग व्यक्त करीत कसेबसे उठ बस करीत दोन किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. वाहनधारक, वीट भट्टी मालक, शेतकरी वर्ग, शाळकरी विद्यार्थी, अकोला वरून अकोट नियमित येणारे जाणारे सर्व विभागाचे कर्मचारी यांची संतप्त प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी व प्रशासनावर प्रचंड ‌रोष हा व्यक्त होत आहे. तसेच सर्वपक्षीय संघर्ष समिती मागील आठ दिवसापासून गांधीग्राम बस स्टॉप येथे सर्व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाविरुद्ध बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

संघर्ष समिती व शाळकरी मुलांची प्रतिक्रिया

यामध्ये सर्वपक्षीय संघर्ष समिती आंदोलनाच्या माध्यमातून कठोर निर्णय घेऊन हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना गाव बंदी करून व येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा घेराव घालून आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असतानाच याची प्रशासनाला कुन कुन लागताच आज काही वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ गांधीग्राम येथील पुलावर येऊन स्पॉट इन्स्पेक्शन केले असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुलाच्या बाजूलाच पर्यायी मार्गाची व्यवस्था होईल असे आश्वासन सर्वपक्षीय संघर्ष समिती यांना दिले असून व सोबतच संघर्ष समितीच्या सर्व अटी शर्थीचे पालन पर्यायी मार्गाच्या निमित्ताने होईल अशी अपेक्षा ठेवून संघर्ष समितीने आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे.

पुलाचे स्पॉट इन्स्पेक्शन करीत असलेले अधिकारी

या यशस्वी आंदोलनातील महत्त्वपूर्ण सहभाग मार्गदर्शन व उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे मनोहरजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजुभाऊ मंगळे,शिवसेनेचे नितीन ताथोड, काॅग्रेस चे पं स सर्कल अध्यक्ष अतुल पाटिल काठोळे, वंचित आघाडीचे सुरेन्द्र ओईंबे, शिवसेनेचे संजय मांजरे तसेच दामोदर, कैलास सदांशिव, सुभाष फुरसुले, शरद ठाकरे,शिवसेनेचे नंदा पाटिल अढाऊ, गावंडे मामा करोडी, काॅग्रेसचे प्रशांत गावंडे, सुनिल फुरसुले , विनोद महल्ले इत्यादी अनेक सामाजिक संस्था यांनी विशेष कामगिरी पार पाडली.

तसेच या आंदोलनामध्ये त्यांचे सहभागी उद्योजक रमेश भाऊ वानखडे ,श्रीकृष्ण गावंडे ,अंबादास आढाव ,प्रकाश फुरसुले ,सुभाष फुरसुले, निरंजन दामोदर, दिवाकर गवळी विनोद मंगळे ,शरद भगवान ठाकरे, सुनील देवराम फुरसुले अतुल दिगंबर काठोळे राजूभाऊ पेटे, ज्ञानदेव परनाते, इंगळे योगेश श्रीकृष्ण गायकवाड विलास साबळे अतुल भाऊ ज्ञानेश्वर बोरोकार मनोज खंडारे नरेंद्र वानखडे धनंजय नारे प्रभाकर वाघमारे विनोद मंगळे मंगेश धुमे, विजय भटकर सुरेश महादेवराव फाळके विशाल लांडे भूषण रामदास नवघरे प्रकाश गोंडचर चेतन पतींगे, संदीप मुंडे यांनी सहभाग घेतला होता.

या आंदोलनाला विशेष भेटी व समर्थन म्हणून भाजपचे मा.आमदार रणजीत दादा पाटील तसेच माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे व शिवसेनेचे आमदार नितीन बापू देशमुख , शेतकरी जागर मंच चे संयोजक प्रशांत भाऊ गावंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ वानखडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर जिल्हा परिषदेचे गटनेता ज्ञानेश्वर भाऊ सुलताने जिल्हा परिषद सदस्य निखिल भाऊ गावंडे शंकरराव इंगळे विलास पाटील वसु अजय भालेराव वैभव श्रीनाथ भिकाजी पातुर भास्कर अंभोरे अभय खुमकर पंकज भाऊ रामदास भाऊ अतुल भाऊ पुणेकर अविनाश मोरे विकास पागृत लकी गावंडे धीरज गावंडे उमेश मेहकर डॉ. योगेश गायकवाड, धनंजय वारे डॉ. ठाकरे भीमराव तायडे व समस्त पंचक्रोशीतील जनता यांचा सर्व प्रकारे भरभरून सहभाग मिळाला व आंदोलन यशस्वी होऊन सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish