भाजपा “पक्ष निधी “याला चंद्रकांत पाटलांच्या भाषेत काय म्हणायचे? भीक, देणगी, भ्रष्टाचार की ब्लॅकमेलिंग करून मिळवलेला करोडो रुपयांचा “पार्टी फंड”
असा थेट सवाल च माहेश्वरी प्रगती मंडळाचे माजी अध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार सागर लोहिया यांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे..
Sagar Lohiya 10 Dec 2022
अकोला : पैठण येथे भर सभेत महाराष्ट्र सरकारमधील जबाबदार व वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बोलताना ताबा सुटला व थेट कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिराव फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू करण्यासाठी अनेक लोकांकडे पदर पसरून भीक मागितले असा उल्लेख केला त्याचे पडसाद महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात उमटले आहेत चंद्रकांत पाटलांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शाही फेक सुद्धा झाली आहे चंद्रकांत पाटलाच्या या बेताल वक्तव्यावर महाराष्ट्रातील सर्वत्र जनसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील नामांकित माहेश्वरी प्रगती मंडळ चे माजी अध्यक्ष सागर लोहिया यांनी तर थेट भारतीय जनता पार्टीचा “पार्टी फंड”(पक्ष निधी) यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे जगाच्या पाठीवर सर्वात जास्त “पार्टी फंड” असलेली भारतीय जनता पार्टी यांनी हा फंड “भीक मागून उभा केलेला आहे की देणगी ” की भ्रष्टाचार लपवण्याकरिता ब्लॅकमेल करून करोडो रुपयांचा “पार्टी फंड” मिळवला आहे असा थेट प्रश्न चंद्रकांत पाटलांच्या या बेताल वक्तव्यावर सागर लोहिया यांनी उपस्थित केला आहे