Monsoon Update: चार दिवस धोक्याचे…!! आजपासून ‘या’ तारखेपर्यंत ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, पंजाबरावांचा हवामान अंदाज
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्रात विश्रांती घेतली होती. राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसात पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला नाही. मात्र आता पुढील चार दिवस पाऊस (Rain) पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला जात आहे.
यामुळे उसंत घेतलेल्या पावसाचा पुन्हा एकदा कमबँक होणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून विश्रांती घेत असलेला पाऊस पुन्हा एकदा कोसळणार असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मित्रांनो आधीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरसदृश्य परिस्थिती यामुळे शेतकरी बांधवांचा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून यामुळे अनेक शेतकरी बांधवांना खरिपात दुबार पेरणी करावी लागली आहे.
यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजाने शेतकरी बांधवांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. खरे पाहता भारतीय हवामान विभागाने ऑगस्टमध्ये सर्वसाधारण पाऊस राहील असा अंदाज वर्तवला होता मात्र अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण बनत असून यामुळे ऑगस्टमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा नवीन सुधारित अंदाज विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, आज 6 ऑगस्ट शनिवारी रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून 4 दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे देखील विभागाकडून सांगण्यात येत आहे.