अॅड प्रवीण तायडे अकोला बार असोसिएशनचे नवे अध्यक्ष-“सर्व विधीज्ञ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण” तायडे यांची घोड्यावर बसून काढली मिरवणूक..
RaviRaj 10 Feb 2023
अकोला : बार असोसिएशनच्या गुरूवारी झालेल्या अॅड. प्रवीण तायडे यांनी ५९६ मते घेत अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. तर महिला उपाध्यक्षपदावर अँड अरुणा गुल्हाने आणि ५२५ उपाध्यक्षपदी अॅड देवाशिष काकड ७६३ आणि सहसचिवपदावर अॅड. शिवम शर्मा यांनी ३३९ मते घेत विजयी झाले आहेत.
अकोला बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया नवीन बारमध्ये गुरूवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पार पडली. या निवडणुकीत अकोला बार असोसिएशनच्या १ हजार ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीच्या मतमोजणीस दुपारी ४.३० वाजता प्रारंभ झाला.
या निवडणूकीत अध्यक्षपदासाठी अधिवक्ता-
अॅड. अर्चना गावंडे, अॅड. हेमसिंग मोहता, अॅड. प्रविण तायडे निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीनंतर प्रवीण तायडे यांनी ५९६ मते मिळवित विजय मिळविला आहे. ॲड. हेमसिंग मोहता यांना ५५६, अर्चना गावंडे यांना ५२ मते मिळाली. उपाध्यक्ष कक्कर यांना ७६३ मते तर गुल्हाने, प्रवीणकुमार होनले २८५, अॅमहिला • सचिवपदी ड. मुरलीधर इंगळे यांना १३५ मते अरुणा गुल्हाणे यांना ५२५ मते मिळाली. तर अॅड. आम्रपाली गोपनारायण ३६५, अॅड. कांचन शिंदे यांना ३०६ मते मिळाली. असोसिएशनच्या सहसचिवपदावर शिवम शर्मा ३३९ मते घेत विजयी झाले. तर निखिल देशमुख ३२६, अॅड. सागर जोशी ३०६, अॅड. महेश शिंदे यांना २२८ मते मिळाली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. उदय नाईक यांनी काम बघितले.
या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष व सहसचिव कार्यकारणीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळते बार असोसिएशनची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड प्रवीण तायडे यांची घोड्यावर बसून मिरवणूक काढल्यामुळे सर्व महिला विधीज्ञ यांचा उत्साह अकोलेकरांना बघायला मिळाला..