INDIA NEWS

Press

राहुल गांधीच्या “वोट चोरी” चळवळीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची भूमिका संशयास्पद..

salim khan 3 September 2025

अकोला जिल्ह्यात महाविकास आघाडीचा मौन..

Akola: जिल्ह्यातील संपूर्ण मतदारसंघात राहुल गांधींनी उभा केलेला ‘वोट चोरी’चा मुद्दा गाजत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र निवडणूक आयोगाविरोधात ठोस आणि आक्रमक पवित्रा घेताना दिसत नाहीत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये या मौनामुळे अस्वस्थता पसरली असून, स्थानिक नेत्यांचा हा मवाळ दृष्टिकोन थेट मतांच्या गळतीस कारणीभूत ठरेल अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

राहुल गांधी देशभरात ‘लोकशाही वाचवा, मतांची चोरी रोखा’ या अभियानातून लोकांमध्ये आक्रमक जनजागृती करत असताना, अकोल्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र निवडणूक आयोगाच्या कारभारावर किंवा ईव्हीएम संदर्भातील शंका-कुशंका यावर सार्वजनिकरीत्या आवाज उठवताना दिसत नाहीत. यामुळे ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत का, की स्थानिक राजकारणात आपले समीकरण जुळवून घेण्यासाठी जाणूनबुजून मौन बाळगले आहे, असा संशय कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

मतदारसंघात उमेदवारांचा हा निष्क्रियपणा आणि मत चोरीच्या मुद्द्यावरची उदासीनता, महाविकास आघाडीच्या जनतेशी असलेल्या संवादाला गंभीर धक्का पोहोचवत आहे. मतदारांना जर आपल्या मतांचे संरक्षण होत नाही असे वाटले, तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

स्थानिक पातळीवर विरोधक आक्रमक पवित्रा घेत असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार फक्त सौम्य विधाने देत शांत राहणे हे पक्षाच्या धोरणाला बाधा आणणारे ठरत असल्याचे चित्र आहे. राहुल गांधींच्या आंदोलनाशी ताळमेळ न साधणारी ही भूमिका महाविकास आघाडीला अकोल्यात महागात पडण्याची भीती राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish