INDIA NEWS

Press

“अहो आमदार साहेब आता तरी जागे व्हा ” मतदार संघात जीवघेणे खड्डेच खड्डे..मात्र आमदार अनधिकृत बॅनर लावण्यात व्यस्त..

RaviRaj 30 August 2024

Akot : गेली दहा वर्षापासून अकोट मतदार संघाचे प्रतिनिधित्व उपरे असलेले आमदार प्रकाश भारसाकळे करीत आहेत. तरीही स्वतःला विकास महर्षी संबोधणारे साधा खड्ड्यांचा इलाज मात्र करू शकले नाही ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना व स्वतःच्या गावी दर्यापूर येथे ये जा करीत असलेल्या आमदारांना एसी च्या गाडीतून खड्ड्यांचा अंदाज येत नाही परंतु अकोट मधील स्थानिक लोकांना या खड्ड्यांचा भरपूर मानसिक त्रास होत असून जीवघेणा प्रवास सहन करावा लागत आहे. विद्यमान आमदार महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश पातळीवरील महत्वाचे नेते मानले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत झोपा काढतात तर मतदार संघातील लोकांच्या भावना काय समजून घेतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भर सभेत स्टेजवर झोपेचा आनंद घेताना निष्क्रियतेचा कळस गाठणारे उपरे आमदार प्रकाश भारसाकळे..

त्यामुळे स्थानिक असलेल्या शिवसेनेच्या नेत्या डॉ मनीषा मते यांनी दर्यापूर रोडवरील स्मशानभूमीच्या जवळील खड्ड्यांची दखल घेऊन बांधकाम विभाग अकोट यांना खड्डे दुरुस्ती करण्यासंबंधीचे निवेदन दिले होते. म्हणून बांधकाम विभागाला जाग आली व लगेच दुसऱ्याच दिवशी दर्यापूर रोडवरील खड्डे बुजवावे लागले.


असाच प्रकार समाजसेवक ॲम्बुलन्स चालक संजय शेळके यांच्या बाबतीत सुद्धा घडला यांनी सुद्धा दोन दिवसांपूर्वी हिवरखेड रोडवरील सूतगिरणीच्या समोरील जीवघेण्या खड्ड्यांची इंडिया न्यूज च्या माध्यमातून बातमी प्रसारित करून स्वतः बांधकाम विभागाचे अधिकारी सुलतान यांच्याशी संपर्क साधून खड्डे दुरुस्ती करण्याची आक्रमक मागणी केली होती.

समाजसेवक संजय शेळके यांनी बांधकाम विभागाला तात्काळ खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले..

त्यामुळे हिवरखेड रोड वरील खड्डे सुद्धा तात्काळ सिमेंट काँक्रीट ने बुजवण्यात आले. परंतु सिमेंट काँक्रेट च्या रस्त्याची दोनच दिवसात पुन्हा “जैसे थे” चाळन झालेली दिसून आली त्यामुळे या भ्रष्टाचारी बांधकाम विभागाला विद्यमान आमदाराच्या कार्यपद्धतीचे पुन्हा एकदा ग्रहण लागल्याचे सिद्ध झाले असून आमदार फक्त बॅनर बाजी करण्यात मग्न आहेत ह्या सर्व महत्त्वाच्या समस्या सोडून रेल्वे पुलावर आमदाराने अनधिकृत बॅनर लावलेले आहे त्यामुळे या रेल्वे पुलाला यापुढे भविष्यात कोणीही अनधिकृत बॅनर लावू शकतात असा संदेशच विद्यमान आमदारांने या माध्यमातून दिला असून एक प्रकारचे प्रोत्साहनच अनधिकृत बॅनर ला दिले आहे.

त्यामुळे रेल्वे पुलाचे बॅनर सुद्धा भविष्यात वाद विवाद घडवणारे ठरणारे आहे. विद्यमान आमदारांना मतदार संघातील जनतेची मते मिळवण्याकरिता फक्त आणि फक्त खालच्या पातळीचे राजकारण करायचे असून कोरडी बॅनर बाजी भविष्यात बघायला मिळणार हे मात्र निश्चित..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish