अहंकार व उर्मठपणामुळे मुन्ना अग्रवाल हा बांधकाम व्यवसायात अयशस्वी ! कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करावे – सलीम खान यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी..
saleem Khan 10 August 2023
अकोट : शहरातील एकमेव असा शशिकांत उर्फ मुन्ना अग्रवाल स्वतःला बांधकाम व्यवसायिक समजणारा हा पूर्णपणे अयशस्वी ठरलेला बांधकाम व्यवसायिक आहे.. मुन्ना अग्रवाल यांने अकोट शहरांमध्ये आजपर्यंत जेवढे काही बांधकाम केलेले आहेत ते सर्व अर्धवट स्थितीत ठेवून अनेक गोरगरिबांची फसवणूक केलेली आहे जवळपास सर्वच बांधकाम हे चार-पाच वर्षातच शिकस्त होऊन लोकांच्या जीवांशी खेळ खेळण्याचे काम शशिकांत अग्रवाल यांच्याकडून सतत सुरू आहे.
मागील दहा वर्षापासून गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असलेला रस्ते बांधकामांमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार करून बांधकाम व्यवसायामध्ये उतरलेला मुन्ना अग्रवाल याला त्याच्या गर्विष्ठ व उर्मट पणाच्या स्वभावामुळे पाहिजे तसे यश मिळाले नाही व बांधकामे अपूर्ण ठेवून सतत लोकांची फसवणूक करणे हा त्याचा नियमित कार्यक्रम झालेला आहे..
परंतु अकोट मधील सर्व सामान्य जनता आता यापुढे मुन्ना अग्रवाल याच्या आमिषाला बळी न पडता कोणताही फ्लॅट किंवा गाळा विकत घेण्यास स्पष्टपणे नकार देत असून फ्लॅट खरेदी कडे पाठ फिरवली आहे. तसेच मुन्ना अग्रवाल चे सर्व बांधकामे कम्प्लिंशन सर्टिफिकेट नसल्यामुळे अपूर्ण असल्याचे नगर प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे..
कम्प्लिंशन सर्टिफिकेट नसल्यामुळे नगर प्रशासनाच्या रेकॉर्डनुसार संबंधित बांधकाम हे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर बांधकाम किंवा फ्लॅटवर बँकेचे कर्ज मिळत नाही व ते बांधकाम शहरांमध्ये स्थित असल्याचा सबळ पुरावा ठरत नाही.. भविष्यात नैसर्गिक संकट तसेच भूकंप आल्यास या बांधकामाचे प्रशासकीय नियमानुसार अस्तित्व उरत नाही… म्हणून शशिकांत उर्फ मुन्ना अग्रवाल यांने मागील दहा वर्षापासून अनेक फ्लॅट धारकांची आर्थिक फसवणूक करून सर्वसाधारण लोकांना मानसिक विवंचनेत टाकलेले आहे. त्यामुळे शशिकांत उर्फ मुन्ना अग्रवाल याच्या विरोधात अनेकांनी आक्रमक पवित्रा घेत कोणताही फ्लॅट किंवा गाळा विकत घेऊ नये… असे आवाहन जनसामान्यांना केले आहे.. व मुन्ना अग्रवाल याला जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी काळया यादीत समाविष्ट करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे..