अजून किती चिमुकल्यांचा बळी घेणार.! दहा रुपये फक्त जीव झाला स्वस्त..
RaviRaj 4 Feb 2025
Akot : सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन मृत्यूनंतरच का ? जिवंत माणसे कवडीमोल मृत्यूनंतरच दखल स्थानिक प्रशासन तसेच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित.. आता तरी विद्यमान आमदारांना घाम येईल का की अजून मृत्यूची वाट बघणार.. सर्व स्थानिक प्रशासनावर प्रशासकिय नियंत्रण आहे परंतु एकमेव लोकनिर्वाचित आमदार असूनही एका चिमुकलीचा बळी जाणे म्हणजेच निष्क्रियतेचा कळस अशा दुःखद भावना अकोट करांनी व्यक्त केले आहेत..

अकोट : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शहरातील रेल्वे ब्रिजवर परवा रात्री दहा वाजताच्या दरम्यान ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात कु. निधी जेस्वानी वय पाच वर्ष या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला या घटनेने शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून जनसामान्यांचा आक्रोश बघायला मिळाला यावेळी या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी काल रेल्वे ब्रिजवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अपघाताला कारणीभूत असलेल्या संबंधित विभागावर तसेच कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली अपघाताला कारणीभूत असलेल्या अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लावण्यासाठी व शिवाजी महाराज चौक पासून ते शिवाजी कॉलेज व अकोला रोडवर पथदिवे लावून गतिरोधक बसवण्याची मागणी सुद्धा आंदोलनामध्ये करण्यात आली या आंदोलनाची दखल म्हणून अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. नरेंद्र बेंबरे यांनी मागण्या पूर्ण करण्याची हमी देऊन आंदोलन स्थगित केले परंतु एका चिमुकलीचा बळी गेल्यानंतर या सर्वपक्षीय नेत्यांना रास्ता रोको आंदोलन करण्याची गरज भासली हा रस्ता रोको मृत्यू अगोदर केला असता तर कदाचित चिमुकली निधी हिचा बळी गेला नसता त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी यापुढे सुद्धा पुढाकार घेऊन अपघात होण्याचे मुख्य कारण अतिक्रमित रस्ते असून मुख्याधिकारी यांच्याकडून तात्पुरते आश्वासन न घेता कायमस्वरूपी इलाज करण्याची आक्रमक मागणी करावी असे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे

दहा रुपये,वीस रुपये च्या पावतीसाठी अकोट नगरपरिषद या हात गाड्यांना रस्त्यावर उभे राहण्याची मुभा देते या हात गाड्यांमुळे रस्ते संकुचित होऊन वाहतुकीकरिता अडचणी निर्माण करतात रस्ते संकुचित असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे यापुढे कुणाचाही अपघात होऊ नये याकरिता तात्काळ दहा रुपये,वीस रुपये,तीस रुपये ला महत्व न देता अपघाताला जबाबदार असणाऱ्या सर्व बांधकाम परवानग्या रद्द करून हातगाड्यांवर सुद्धा कायमस्वरूपी कठोर कार्यवाही या निमित्ताने मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी करावी अशा प्रकारची सर्वसमावेशक मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी करणे गरजेचे आहे अन्यथा दहा रुपयाच्या पावतीपेक्षाही आकोट करांचा जीव स्वस्त झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही