अजित दादाच्या राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष अनेक महिलांचा बळी घेणार ! आसाम दंगल मधील कुख्यात आरोपी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष..
RaviRaj 4 August 2024
अकोट येथील माजी काँग्रेस नेते व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले मो.बद्रुजमा यांच्या आयोजित काल झालेल्या जनसंवाद दौऱ्यामध्ये आमदार अमोल मिटकरी व जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी उपस्थिती लावली..
मो.बद्रुजमा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आकोट मध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न भर पावसात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसला..
परंतु आसाम दंगल मधील कुख्यात असलेला मुख्य आरोपी जाकीर शाह रशीद शाह हा मात्र कार्यक्रमाच्या स्टेजवर जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या बाजूला शहराध्यक्ष नात्याने उपस्थित होता.. त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्राचे कामगार सेलचे माजी अध्यक्ष राहिलेले मो.बद्रुजमा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या बद्रूजमा यांना शहराध्यक्ष पदासाठी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणारा दंगल घडवून आणणारा मुख्य आरोपीच मिळाला..
यावरून अजित दादा च्या राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांचा खूप मोठा अभाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वावर संशय निर्माण झाला..कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पाय रोवण्याकरिता कुख्यात गुंडाला सोबत घेण्याची वेळ बद्रुजमा यांच्यावर आली आहे.. महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले बद्रूजमा यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी अनेक महिलांची फसवणूक करणारा कुख्यात गुंड जाकीर शाह रशीद शाह शिवाय चांगल्या प्रतिमेचा एकही कार्यकर्ता नसल्याची खंत राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात घुसमत आहे..कार्यक्रमाच्या दरम्यान तालुकाध्यक्ष असलेले व राजकीय नावलौकिक जपणारे राजेश भालतिलक यांना मात्र खाली बसवण्यात आले ..
राजेश भालतिलक यांना खाली बसवून अपमान कारक वागणूक देण्याचे कटकारस्थान कुणाकडून रचल्या गेले असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.. जाकीर शाह सारख्या दंगलखोर प्रवृत्तीची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाला गरज आहे का ? की राष्ट्रवादीकडे जाकीर शाह शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.. येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष यांनी पक्ष बांधणीवर भर देण्याची गरज आहे परंतु फक्त नियुक्त्या करून पक्षश्रेष्ठीकडे जबाबदारी पूर्ण केल्याची शाबासकी घेण्यातच जिल्हाध्यक्ष मग्न आहेत..कदाचित राजेश भालतिलक प्रमाणेच चांगले व्यक्तिमत्व शहराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादीला मिळाले नाही.. किंवा जिल्हाध्यक्ष यांनी अकोट शहराला सक्षम नेतृत्व देण्याचा प्रयत्नच केला नाही.. असा संशय अजित दादांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गोटात निर्माण झाला आहे ..शहरांमध्ये दंगल घडवणारा जाकीर शाह रशीद शाह याच्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष उभा राहण्या अगोदरच संपुष्टात येणार हे निश्चित..अशा या गुंड प्रवृत्तीच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षाला भाजप पक्षाने अनेकदा नाकारले सोबतच काँग्रेस पक्षाने स्वीकारले नाही आणि एम आय एम पक्षातून सुद्धा दंगलचा कुख्यात आरोपी म्हणून हकालपट्टी झालेला जाकीर शाह ला अजित दादाच्या राष्ट्रवादीने आधार देण्याचे काम केले त्यामुळे जाकीर शाह ने फसवणूक केलेल्या महिलांचा उद्रेक व आक्रोश यापुढे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमात बघायला मिळणार अशी कठोर भूमिका महिलांनी घेतल्याची माहिती आहे..
चोहोट्टा येथील सरपंच नंदू राणे यांची शेत जमीन हडपण्याचा प्रयत्न अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा अकोट शहर अध्यक्ष जाकीरशाह रशीद शाह करीत आहे..
चोहट्टा येथील विद्यमान सरपंच नंदू राणे यांचे शेत जमीन गैर कायदेशीर हडपण्याचा प्रयत्न जाकीर शाह हा करत असल्यामुळे राणे यांनी सुद्धा जाकीर शाह विरुद्ध दंड थोपटले आहेत.. त्यामुळे जाकीर शाह ला शहराध्यक्ष पद टिकून ठेवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे.. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा फायदा घेऊन महिलांची फसवणूक करण्याकरिता एक प्रकारचे प्रोत्साहनच जाकीरशाहला मिळाले आहे.. त्यामुळे भविष्यात अनेक महिलांचा बळी जाकीर शाह घेणार हे मात्र निश्चित ?