अकोला: अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार..
Ravi Raj 23 Oct 2022
आसेगाव बाजार : खरे तर आज दिवाळी निमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्याचे पर्व आहे त्यासोबतच राज्य शासनाने दिवाळी गोड व्हावी याकरिता राज्यातील प्रत्येक गावोगावी आनंदाचा शिधा वाटप करण्याचे ठरवले आहे हा आनंदाचा शिधा आणि दिवाळी तोंडावर आल्यामुळे तात्काळ वितरित करण्याचे आदेश हे राशन वितरकांना मिळालेले आहेत म्हणूनच दिवाळीच्या अगोदर हा आनंदाचा शिधा प्रत्येक गोरगरिबाच्या घरात पोहोचण्याकरिता रात्री उशिरापर्यंत शिधा वाटप हे राशन वितरकांकडून सुरू आहे परंतु अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील राशन दुकानात शिधा घेण्याकरिता सर्व गावातील गोरगरीब येत असून सहकारी सोसायटीच्या गोडाऊनमध्ये नियमित शिधावाटप सुरू आहे परंतु राशन दुकानासमोरील भव्य दिव्य असा मा.आ.अमोल मिटकरी यांच्या विकास निधीतून उभा चार एलईडी बल्ब असलेला LED Street Light Electric Pole(विजेचा खांब) आहे परंतु त्यावर मागील अनेक दिवसांपासून एकच एलईडी बल्ब सुरू आहे त्यावरील अतिशय महत्त्वाचे बाकी तीन एलईडी बल्ब सतत बंद असतात आसेगाव बाजार हे जवळपास दहा हजार लोकसंख्या वस्तीचे गाव असून जि प सर्कल सुद्धा आहे गावातील सर्वच राशनधारक हे राशन दुकानात राशन घेण्यासाठी येत असतात व सहाजिकच एवढे मोठे गावाची व्याप्ती असल्याने दुकानांमध्ये गर्दी ही होतेच त्या गर्दीमुळे दुकानाच्या आजूबाजूला अनेक लोक थोडा वेळ बसण्याचा आश्रय घेत असतात परंतु राशन दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरात हा रात्रीच्या अंधारात संपूर्ण काळोख असल्यामुळे लोकांना त्या अंधारात जीव मुठीत धरून आनंदाचा शिधा घेण्यासाठी तासंतास बसावे लागते त्यामुळे एवढा संवेदनशील महत्त्वाचा प्रश्न असूनही प्रत्येक ठिकाणी राजकारण न होता तात्काळ दोन एलईडी बल्ब राशन दुकानासमोरील विजेच्या खांबावर लागणे गरजेचे आहे व ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळीनिमित्त सर्व गावातील वातावरण हे प्रकाशित होण्याचे काम ग्रामपंचायत कडून होणार नाही की काय? अशी गावकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असून ग्रामपंचायतीच्या उदासीन व भोंगळ कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..