अकोला : गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरच्या पुलास अचानक तडा गेल्याने अकोट- अकोला महामार्ग वाहतुकीसाठी अनिश्चित काळासाठी बंद…
अकोला: एकीकडे सरकार अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर अकोला महामार्ग ७२ तासात पूर्ण केल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याची सर्व जगभर स्वतःचे कौतुक व गाजावाजा करून घेते आणि त्याच जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील व महत्त्वाचा महामार्ग असलेला गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरचा पूल याकडे सतत दुर्लक्ष करते… याचे कारण काय? सरकारमधील आमदार प्रतिनिधी की सुस्त प्रशासन ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत..
Ravi Raj 18 Oct 2022
अकोट: अकोट अकोला महामार्ग हा जिल्हा पातळीवरचा अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा महामार्ग आहे. आज अकोट अकोला महामार्ग वरील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरचा ब्रिटिश कालीन १५० वर्षांपूर्वीचा पूल त्याला अचानक खूप मोठ्या प्रमाणात तडा गेल्या असल्याने आज पासून पुढील अमर्यादीत काळाकरिता वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे हा पूल अत्यंत महत्त्वाचा व अनेक खेड्यापाड्यांना जोडणारा असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास अकोट तालुक्यासह पाचशे च्या वर खेडेगावांचा थेट संपर्क तुटला आहे या सर्व लोकांना वाहतुकीसाठी 50 किलोमीटर अंतर व दोन तास जास्तीचे अकोला येथे पोहोचण्यासाठी लागणार आहेत याचा मनस्ताप अनिश्चित काळासाठी सहन करावा लागणार आहे. तसेच या नवीन पुलाची निर्मिती व बांधकामाची मागणी अनेक वर्षापासून प्रशासन व निष्क्रिय सरकार यांच्याकडे प्रलंबित असून अनेक वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे परंतु त्याची पूर्णतः अंमलबजावणी करायला अजून किती वर्षे लागतील असा प्रश्न जनसामान्यांमध्ये आहे. हा पूल ब्रिटिशकालीन असल्याने या पुलाची बांधकाम मर्यादा मागील पंचवीस वर्षापासून संपलेली असूनही नवीन पुलाची निर्मिती आज पावेतो झालेली नाही नियमानुसार जुने बांधकाम मर्यादा संपल्यानंतर तात्काळ बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती होणे गरजेचे असते परंतु या राज्यामध्ये व देशांमध्ये कुठलीही जीवित हानी किंवा नुकसान झाल्याशिवाय सरकारला व सुस्त प्रशासनाला दखल घेण्याची गरजच वाटत नाही याचा सर्वत्र खेद व्यक्त होत आहे प्रशासन व सरकारच्या या उदासीन व भोंगळ कारभारामुळे जनसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवासात वाढलेले अंतर व जाणारा वेळ आणि पैसा याचा होणारा मानसिक त्रास सतत सरकार व मतदार संघातील आमदार प्रतिनिधी व संबंधित विभाग यांच्या बद्दल तीव्र नाराजी ही लोकांच्या मनात कायम राहील व याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीत राहील …तसेच देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन ही अजूनही मूलभूत सुविधा मिळण्यापासून राज्यातील जनता वंचित आहे या निमित्ताने असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत…