INDIA NEWS

Press

अकोला: जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून सुद्धा जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा अजूनही पोहोचलाच नाही..

Ravi Raj. 24 Oct 2022

उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा गोरगरिबांना व महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिवाळी भेट म्हणून जाहीर केला व त्याचप्रमाणे खूप गाजावाजा करून राज्यावर अतिवृष्टीचे संकट असल्यावरही आनंदाचा शिधा मिळतो याचा थोडाफार आनंद लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु दिवाळी अखेर सुद्धा राज्य शासनाचा आनंदाचा शिधा जिल्ह्यातील गोरगरिबापर्यंत अजूनही पोहोचलाच नाही तसेच नियमित दर महिन्याला मिळणारे राशन सुद्धा अनेक राशन दुकानदारांनी वाटप बंद केले आहे त्यामुळे यंदाची दिवाळी ही जिल्ह्यातील गोरगरिबांना झुणका भाकर खाऊनच साजरी करावी लागत आहे सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेले सर्वच आश्वासन फोल ठरले आहेत
राशन दुकानदारांना नियमित वाटप करताना सुद्धा नेटवर्क नसल्यामुळे मशीन द्वारे होणारे राशन चे वाटप करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच आनंदाचा शिधा मिळेल या आशेने अनेक लोकांनी दिवाळी मधील गोड पदार्थांची पूर्वतयारी सुद्धा केली नाही परंतु आनंदाचा शिधा अजूनही जिल्ह्यातील अनेक राशन दुकानापर्यंत पोहोचलेलाच नसल्यामुळे लोकांच्या आनंदावर विरजण पडले असून विद्यमान सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्ह्यातील जनतेतून नाराजी व रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी मुळे शेकडो गावातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढगफुटी मुळे झालेले नुकसान पाहण्याची तसदी सुद्धा घेतली नाही उलट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत देण्यापासून अकोला जिल्हा हा वगळण्यात आला अशा अनेक जिल्ह्यातील समस्या वर तोडगा न काढता अकोला जिल्हा हा सतत योजना व अनेक लाभांपासून सतत वंचित राहतो आहे याला जबाबदार कोण? जिल्ह्यातील लोकांचा अति समजूतदारपणा की प्रशासनाचे ढिसाळ नियोजन? की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेला अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा अतिरिक्त भार.. असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून लोकांमध्ये गोंधळ व संभ्रम निर्माण झालेला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish