INDIA NEWS

Press

अकोला: जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक अतिवृष्टी होऊन सुद्धा अतिवृष्टीचा भागाचा दौरा न करता जिल्ह्याचे पालकमंत्री हे अंधेरी पोट निवडणुकीत मग्न…

अकोट: तालुक्यातील शिवपुर बोर्डी, उमरा, बेलुरा, जैनपुर, पिंपरी, यदलापूर, अशा अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करणे याकडे दुर्लक्ष करीत पाठ फिरवली आहे..

Ravi Raj. 14 Oct 2022

मा. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा

अकोट: तालुक्यातील शिवपुर बोर्डी, उमरा, बेलुरा, जैनपुर, पिंपरी, यदलापूर, अशा अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. शेतातील पिका सोबतच गावातील अनेक घरांची पडझड किमती वस्तू पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात व भरभरून पीक उभे असलेल्या शेतकऱ्याच्या आनंदात खूप मोठे विरजण पडलेले आहे. मागील अनेक दिवसापासून सततच्या मुसळधार पावसामुळे सर्व प्रकारचे अतोनात नुकसान झालेले आहे तसेच अकोट तालुक्यामध्ये ऐतिहासिक पावसाची नोंद झाली असून अनेक सन्माननीय सर्वपक्षीय नेते मंडळी तालुक्यातील अतिवृष्टी भागात पाहणी करीत आहेत. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये आलेले कोणतेही संकट कोरोना असो की अतिवृष्टी इतर कुठल्याही संकटाला जिल्ह्यातील सक्षम अधिकारी व त्यासोबतच जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री हे पुढाकार घेऊन तात्काळ त्या भागाची पाहणी करून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतात असा अकोला जिल्ह्याचा इतिहास व परंपरा आहे. परंतु एवढी मोठी अतिवृष्टी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊनही विदर्भातील सात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी अकोट तालुक्यातील अतिवृष्टी भागात पाहणी दौरा करणे अति महत्त्वाचे वाटले नाही. बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न मा. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेला दिसत नाही शेतकऱ्यांचे सांत्वन करायला पालकमंत्री यांच्याकडे वेळ नाही सात जिल्ह्याचा कार्यभार सांभाळत असताना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील जनतेला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा देवेंद्र- फडणवीस हे अकोला जिल्हा सोबतच बाकी सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्यास सक्षम आहेत का? असा प्रश्न जिल्ह्यातील अतिवृष्टी पाहणी च्या निमित्ताने उपस्थित होत आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये व गावातील सरपंच जिल्हा परिषद सदस्य इतर पदाधिकारी व शेतकरी बांधव यांच्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish