INDIA NEWS

Press

अकोला: खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी शोधण्यात पोलिसांना आले यश..

तीन महिन्या पासून होता फरार

D.k.mandve 2 Nov 2022

civil line police station

अकोला: शहरातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुस्क्या आवळ्यात पोलिसांना यश आले असून या आरोपीस मूर्तिजापूर येथून पोलिसांनी अटक केली

अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच अकोला जिल्ह्यात चार हत्या झाल्या त्यातील अकोला शहरात सलग दोन हत्या या भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. पण आपला कामाचा कसब पणाला लावून यातील अकोला शहरात झालेल्या दोन्ही हत्येतिल आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आल्या नंतर अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी कम्बर कसली असल्याचे पाहावयास मिळत आहे…

सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या न्यू तापडिया नगर येथे 14 ऑगस्ट 2022 रोजी वर्चस्वाच्या वादातून चाकूने वार करीत 35 वर्षीय विनोद वामन ठोंबरे याची छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी मुख्य आरोपी ऋत्विक सुधीर बोरकर हा तेव्हा पासून फरार होता. गुन्हेगार प्रवृत्तीच्या ऋत्विक बोरकर वर ऐनपीडीऐ मकोका याच्या सह विविध गुन्हे देखील दाखल आहेत. विनोद ठोंबरे याच्या हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या या आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी कसब पणाला लावली असता हा कुख्यात आरोपी मूर्तिजापूर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला पण या शातीर गुन्हेगारास याची चुनचून लागताच हा आरोपी तेथून फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ऋत्विक बोरकरच्या मुसक्या आवळल्या असून त्याला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन च्या स्वाधीन देण्यात आले.

या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फाईल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, भूषण मोरे, छोटू पवार, संदीप तराळे संजय पांडे, अस्लम शाहा, संतोष चिंचोळकर, इम्रान शाहा यांनी परिश्रम घेतले. विशेष बाब म्हणजे या आधी देखील जठार पेठ चौकात झालेल्या विशाल कपले याच्या मारकऱ्यांना देखील दोन तासातच अटक करण्यात अकोट फाईल पोलिसांच्या डी बी पथकला यश आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish