अकोला : महानगरपालिका खड्डे बुजवण्याकरिता सक्षम नसेल तर आम्ही खड्डे बुजवणार- महापालिकेने तात्काळ जाहीर करावे.. निलेश देव यांचे आव्हान..
RaviRaj 19 August 2023
Akola: महापालिकेने जाहिर करावे खड्डे बुजविणे शक्य नाही..
अन्यथा, निलेश देव मित्र मंडळ खड्डे बुजविणार..
गेल्या काही महिन्यापुर्वी जठारपेठ, न्यू तापडीया नगर मुख्य भागातील खड्डे बुजविणे आणि रस्ते चांगले करण्यासाठी निलेश देव मित्र मंडळाने आंदोलन केले होते. त्यानंतर देखील महापालिकेने खड्डे बुजविले नाही. त्याच बरोबर पुढील काळात गौरी गणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे. तत्पुर्वी महापालिकेने खड्डे बुजविणे आवश्यक आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत महापालिकेने जाहिर करावे की त्यांना शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविणे शक्य नाही. महापालिकेने ते जाहिर न केल्यास लोकहितास्तव निलेश देव मित्र मंडळ जठारपेठ, न्यू तापडीया नगर भागातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेईल. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी दिली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही. आंदोलन करुन सुध्दा अकोला महापालिकेच्या वतीने खड्डेमुक्त अकोला करु न शकल्याने गणेशोत्सव पुर्वी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. अकोला शहरातील लालबागचा गणेश मुर्ती व बाकी अनेक गणेशमूर्ती या गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी जातात , शहरातील लालबागचा राजा ज्या जठारपेठ भागातुन जातो. या स्त्यावरील खड्डे आम्ही मागील १० वर्षीपासुन सतत बुजवित आलो आहे. मागील वर्षी भर उन्हाळ्यात आंदोलन केलं तेव्हा याच मनपाच्या अधिकार्यांनी शहरातील मुख्य रस्ते लगेच सुरु करतो सांगितले होते. डांबरीकरण चे रस्ते हे जुन नंतर सुरु करता येत नाही तर सद्या स्थितीत मुख्य रस्त्यावरील खड्डेमुक्त तरी करुन देण्याची गरज निलेश देव यांनी आंदोलन करताना व्यक्त केली होती. पण मनपाचे अधिकारी वर्ग लोकहिताचे काम करत नाही.निदान गणेश भक्तांना त्रास होऊ नये याचे सुद्धा भान महानगरपालिकेच्या सुस्त व निर्दयी अधिकाऱ्यांना राहिलेले दिसत नाही.
महानगर प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अनियोजित कारभार व भ्रष्टाचाराचा कळस गाठला असुन त्यांच्या कडुन कोणत्याही प्रकारची अपेक्षा अकोलेकरांना आता राहिली नाही. खड्डेयुक्त रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. मनपाने ३१ ऑगष्ट पर्यंत लालबाग राजा जाणार्या रस्त्यावरील सर्वच्या सर्व खड्डे बुजवावे अन्यथा १ सप्टेंबर पासून या मार्गावरील खड्डे हे निलेश देव मित्र मंडळ व गणेशभक्तांच्या वतीने बुजविले जातील. यामध्ये सामाजिक कार्यकर्ता निलेश देव सोबतच अनेक संघटनांचा पुढाकार राहील असा निश्चय निलेश देव व मित्रमंडळींनी केलेला आहे..