INDIA NEWS

Press

अकोला पोलिसांची भूमिका संशयास्पद ! जनसामान्यांना कठोर कायदा व नेत्यांना शिथिलता..

Sagar Lohiya 14 August 2024

अकोला येथील रेल्वे स्टेशन वरील आर एस हॉटेल च्या समोरील कार्यकर्त्यांच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या..

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत हे निरीक्षक म्हणून अकोला जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरिता आले असून अकोला रेल्वे स्टेशन वरील आर एस हॉटेल येथे काल रात्रीपासूनच संजय राऊत मुक्कामी होते त्यामुळे त्यांना भेटण्याकरिता आज सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांची व विधानसभा लढणाऱ्या इच्छुकांची रीघ लागली होती..परंतु अकोला रेल्वे स्टेशन वरील आर एस हॉटेल समोरील रस्ता हा रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड ला जोडणारा मुख्य रस्ता असून सतत गजबजलेला असतो त्यामुळे आर.एस हॉटेलची स्वतःची पार्किंग व्यवस्था आहे..परंतु आज ह्या सर्व घडामोडी पाहता सकाळपासूनच शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्यांचा ताफा रस्त्यावरच उभा असल्यामुळे अकोट व दर्यापूर मार्गाने जाणारी वाहतूक संपूर्णपणे खोळंबली असून पोलीस प्रशासन सुद्धा हतबल असल्याचे दिसून आले..

अकोट दर्यापूर मार्गाने जाणारे सर्व प्रवाशांना कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनसामान्यांच्या गाडीला तात्काळ दंडात्मक कारवाई करणारे अकोला पोलीस आज मात्र या सर्व प्रकारावर जाणीवपूर्व डोळेझाक करताना दिसले..गोरगरिबांसाठी अगदी दादागिरीने दंड वसूल करणारे कायद्याचे रक्षक आणि आर एस हॉटेल समोरील संपूर्ण ट्रॅफिक जाम झाल्यावरही सामान्य जनतेला मनस्ताप होत असताना या रस्त्यावरील वाहनांना शिथिलता देणारे अकोला पोलीस मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याची खंत अनेक प्रवाशांनी बोलून दाखवली.. यापुढे सुद्धा आढावा बैठकींचा, सभांचा तडाखा खूप जास्त प्रमाणात जोर धरणार आहे त्यादरम्यान अशाच प्रकारची भूमिका पोलिसांची राहिल्यास विधानसभा निवडणुका होईपर्यंत पुढील तीन महिने जनसामान्यांना असाच मनस्ताप सहन करावा लागणार हे निश्चित ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish