अकोला पोलिसांची कार्यप्रणाली संशयास्पद-आरोपींना अभय देण्याचे प्रयत्न ! चंद्रकांत अवचार यांचे आरोप..
Sagar lohiya 19 July 2023
अकोला : येथील अतिशय सुसंस्कृत असलेले वर्धमान नगर येथील चंद्रकांत अवचार हे गेली कित्येक वर्षापासून निस्वार्थ भावनेने योगा शिकवण्याचे कार्य अविरत करीत आहेत व चंद्रकांत अवचार हे अतिशय मृदू भाषिक व सुसंस्कृत संस्कारी असलेले आदरणीय व्यक्तिमत्व आहे..
त्यांच्या याच स्वभावाचा फायदा घेत योगा वर्ग बंद करण्याच्या हेतूने गुंड प्रवृत्ती असलेल्या स्वप्निल देशमुख याने अचानक 3 जुलै 2023 रोजी चंद्रकांत अवचार यांच्यावर गैरसमजातून फायटरने हल्ला चढवला त्यामध्ये चंद्रकांत अवचार व त्यांचा परिवार किरकोळ जखमी सुद्धा झाला या घटनेची तात्काळ तक्रार हे खदान पोलिस स्टेशन अकोला येथे सविस्तर नोंदवण्यात आली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही..
खदान पोलिसांनी आरोपी स्वप्निल देशमुख याच्यावर गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीला मात्र अटक करू शकले नाहीत शेवटी हताश होऊन चंद्रकांत अवचार हे कुटुंबासह अनेक शेकडो ज्येष्ठ नागरिकांना व अनेक वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांना घेऊन आज दिनांक 17 जुलै 2023 ला अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले..
परंतु चंद्रकांत अवचार यांच्यासह अनेक महिला व दोनशेच्या वर असलेले जेष्ठ नागरिक यांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासमोर खदान पोलिसांची निष्क्रियता स्पष्ट करण्यासाठी तीन तास तात्काळत पोलीस अधीक्षक कार्यालयात बसावे लागले तरीसुद्धा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक भेटायला आले असून सुद्धा संदीप घुगे यांनी पायऱ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात धावती भेट घेऊन समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे..
तक्रारकर्त्यांला समाधान कारक दिलासा न देता व संदीप घुगे यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची सन्मानाची वागणूक मिळाली नसून घुगे हे तात्काळ निघून गेले यामुळे अकोला पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे आम्ही ज्येष्ठ नागरिक अकोला शहरांमध्ये सुरक्षित नाही अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे तसेच अकोला पोलीस यांची कार्यक्षमता ही समाधानकारक दिसत नसून आरोपींना सुपीक असल्याचे निदर्शनास येत आहे..
शेकडोच्या संख्येने जेष्ठ नागरिक पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटायला गेले असूनही घुगे यांनी पाहिजे तशी कार्य तत्परता दाखवून या प्रकरणाची दखल घेतलेली नाही व खदान पोलिसांनी आरोपी स्वप्निल देशमुख याला अटकेपासून संरक्षण मिळण्याकरिता मुभा देण्याचे काम केले असल्याची संशयास्पद भूमिका स्पष्ट होत आहे.. पोलिसांच्या अशा निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे आज रोजी ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांचे कुटुंबीय दहशतीखाली जगत आहेत
मागील काही काळापासून अकोला शहरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक गुंड प्रवृत्ती फोफाळली आहेत व अकोला पोलीस या गुंड प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यात अयशस्वी ठरले आहेत त्यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे अकोला शहरांमध्ये कायदा हा कुणासाठी आहे हा संशोधनाचा विषय झालेला आहे तसेच पुन्हा या निमित्ताने अकोला पोलिसांची निष्क्रियता या प्रकरणामुळे समोर आली आहे अकोला पोलीस अधीक्षक यांचा कार्यकाळ हा सतत वादग्रस्त राहिलेला आहे व त्यांची कार्यपद्धती ही वेळ काढू पणाची या निमित्ताने दिसत आहे असे आरोप जनसामान्यातून होत आहेत..