अकोला पोलिसांना अवैध दारू विक्रेत्याचे थेट चॅलेंज.. गोरगरिबांना दंड अन् वरली बहाद्दरांना अभय..
Deepak dabhade 25 April 2025

अकोला
अकोला पोलिसांना झाले तरी काय एकीकडे हेल्मेट सक्ती गोरगरिबांकडून हजारो रुपयाचा दंड वसुली तर दुसरीकडे अवैध धंद्यांना प्रोत्साहन दारू, मटका, वरली, जुगार, क्लब खुलेआम संपूर्ण जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू आहेत पोलिसांचे कोणतेही नियंत्रण या सर्व अवैध धंद्यांवर राहिलेले दिसत नाही तसेच पोलिसांनाच वरच्या कमाई करिता हे धंदे सुरू असणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे बार्शीटाकळीचे ठाणेदार यांच्याकडून मुर्तीजापुरचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना थेट शिवीगाळ केली जाते तर दुसरीकडे तेल्हारा पोलिसांची हतबलता समोर आली तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रौंदळा गावातील नागरिकांनी अवैध दारू कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामपंचायत चा ठराव घेतला असून तशा प्रकारची तक्रार सुद्धा नोव्हेंबर 2024 ला तेल्हारा पोलीस स्टेशन ला दिली

तेल्हारा येथील निष्क्रिय व अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणारे ठाणेदार प्रमोद उलेमाले
परंतु गेली सहा महिन्यापासून ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी अवैध दारू विक्रेता सागर अबगड याच्यावर कोणतीही प्रतिबंधक कार्यवाही केली नाही उलट सागर अबगड याला प्रोत्साहन देण्याचे काम ठाणेदार उलेमाले यांनी केले आहे त्यामुळे अवैध दारू विक्रेता सागर अबगड याची हिम्मत वाढून संपूर्ण गावातील नागरिकांना कुराडीने मारून टाकण्याच्या धमक्या देत आहे

पोलिसांना चॅलेंज करणारा रौंदळा येथील दारू विक्रेता सागर अबगड
तसेच जिल्ह्यातील संवेदनशील ओळखल्या जाणारे अकोट येथे नामांकित दैनिकाचा शहर प्रतिनिधी असलेला पत्रकार हा वरली बहाद्दर असून पोलिसांनी त्याला वसुली अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे त्यामुळे बार्शीटाकळी, तेल्हारा, व अकोट या तीनही ठिकाणी पोलिसांची हतबलता दिसून येते सर्वसामान्य जनतेला पोलिसांकडून वेगळी वागणूक दिली जाते आणि अवैध धंदे करणारे वरली बहाद्दर, दारू विक्रेते यांना वेगळी, असे दोन स्वयंघोषित कायदे पोलिसांनीच निर्माण केलेले आहेत एकीकडे हेल्मेट सक्तीच्या नावावर जनतेला हजारो रुपयाची दंडात्मक कारवाई करून वेठीस धरणे तर दुसरीकडे अवैध धंद्यांकडून लाखो रुपयांचे हप्ते दरमहा सन्मानाने वसूल करणे हा एकमेव अजेंडा अकोला पोलिसांचा दिसून येत आहे याचा खूप जास्त अतिरेक होत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस ढासाळत चाललेली आहे तरी अकोला पोलिसांकडून हेल्मेट सक्तीच्या नावावर होत असलेली जनतेची लूट कधी थांबणार असे अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत