अकोला पूर्व मतदार संघातील रस्ते गायब तर आकोट मधील रस्त्यांचा दर्जा निकृष्ट
RaviRaj 26 March 2025

रस्ता चोरी झाला की खाल्ला
पुंडा येथील गावकऱ्यांच्या आरोप
वेताळबाबा ते पाटसुल या रस्त्याची दुरावस्थातर वडनेर गंगाई ते पुंडा रस्ता झाला गायब
अकोट: अकोला पूर्व मतदार संघातील अकोट तालुक्यातील पुंडा या गावातील रस्ता हा चोरीला गेला असल्याची तक्रार पुंडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली आहे जिल्हा परिषद अंतर्गत वार्षिक निधी मधून मंजूर झालेला पुंडा ते वडनेर गंगाई हा रस्ता मधातूनच गायब झाल्याची घटना पुंडा या गावात घडली हा रस्ता 800 मीटर पैकी 600 मीटर रस्त्याची रोलर ने दबाई केली नाही सोबतच मुरूम तर औषधाला सुद्धा दिसत नाही काळ्या मातीवर थेट तात्पुरते खडीकरण केले आहे यामध्ये मध्यभागी 200 मीटरचा रस्ता अख्खा गायब करून टाकलेला आहे या रस्त्याचे कंत्राटदार अमोल गडम असून इंजिनीयर मोनाली कडव हे आहेत हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवून अपूर्ण ठेवला असून सुद्धा इंजिनियर मोनाली कडव यांनी कंत्राटदार अमोल गडम यांना 9,69,977 लाख रुपये बिल अदा केले हा सर्व भ्रष्टाचार इंजिनियर व कंत्राटदार यांनी संगणमताने केल्याचा आरोप ग्रामस्थ तसेच उपसरपंच सुधाकर पुंडकर यांनी केला आहे
तसेच इंजिनीयर मोनाली कडव यांच्याच अखत्यारीत असलेला वेताळ बाबा मंदिरापासून तर पाटसुल पर्यंत असलेला अंदाजे अर्धा किलोमीटर डांबरीकरण रस्ता हा सहा महिन्यातच खराब झाला आहे या डांबरीकरण रस्त्याने अजून दुसरा पावसाळा सुद्धा बघितलेला नाही तरीसुद्धा या रस्त्याचे पूर्णपणे बारा वाजले आहेत जनतेच्या लाखो रुपयाचा चुराळा अशा निष्क्रिय व भ्रष्ट शासनातील अधिकाऱ्यांमुळे होत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता करून कंत्राटदराने मात्र संबंधित अधिकाऱ्यांना टक्केवारी निश्चित करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत असे आरोप पाटसुल येथील ग्रामस्थ गजानन बोरकर यांनी केले आहेत
यावरून मोनाली कडव यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचे हाल यापुढेही असेच होणार आहेत आणि या भाजप सरकार मध्ये जनतेच्या पैशाची लूट अशीच सुरू राहणार सरकारचे कोणतेही नियंत्रण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नसल्याचे दिसून येते उलट अधिकारी व कंत्राटदार यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा संशय निर्माण झाला आहे त्यामुळे यापुढे महायुती सरकारला धडा शिकवणार असल्याचा आक्रमक पवित्रा दोन्हीही गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे
प्रतिक्रिया
वेताळबाबा मंदिर ते पाटसुल हा रस्ता अत्यावश्यक आहे सर्व भक्त मंडळी या रस्त्यावरून वेताळ बाबाच्या दर्शनाला जातात एवढा मोठा भावनिक विषय असून सुद्धा कंत्राटदार व इंजिनियर मोनाली कडव यांनी निकृष्ट दर्जाचा रस्ता करून आम्हाला देवाधर्माच्या कामात अडथळा आणण्याचे काम केले आहे

प्रभाकर बोरेकर
पाटसुल येथील ग्रामस्थ
प्रतिक्रिया
पुंडा ते वडनेर गंगई हा रस्ता तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी अडवला होता रस्त्याची भरती व रुंदीकरण सुरू असताना अनेक शेतकऱ्यांनी रस्ता पूर्ण करू दिला नाही त्यामुळे अंदाजपत्रकामधील उर्वरित निधी परत गेला तसेच वेताळ बाबा ते पाटसुल रस्त्याच्या कंत्राटदाराला रस्ता सुधारित करण्यासाठी नोटीस पाठवणार आहे
मोनाली कडव
अभियंता पंचायत समिती अकोट
पुंडा ते वडनेर गंगाई हा रस्ता अत्यावश्यक असून आमच्या शेतातील पिके घरापर्यंत आणणे मुश्किल झालेले आहे शेती करणे कठीण होऊन गेले आहे रस्ता चोरी गेल्यामुळे आम्हाला पाऊलवाटेने शेतीविषयक कामे करावी लागत आहे पावसाळ्यामध्ये पीक काढण्यासाठी मरण यातना भोगाव्या लागत आहेत आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व गावकरी मंडळी या रस्त्या करिता धरणे आंदोलन करणार आहोत
सुधाकर पुंडकर
पुंडा उपसरपंच