अकोला : उद्धव ठाकरे शिवसेनेचे खा.विनायक राऊत व आ.नितिन देशमुख आणि इतर अन्य लोकांवर अकोल्याच्या रेल्वे (जीआरपी) पोलिसात गुन्हे दाखल!
Raviraj 23 Nov 2022
अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि शिवसेना आमदार नितिन देशमुख आणि इतर अन्य लोकांवर आज रात्री अकोल्याच्या रेल्वे म्हणजे जीआरपी पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना अश्लील भाषेत बोलल्या प्रकरणी विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव, एकत्रित येऊन घोषणाबाजी, अश्लील भाषेत बोलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.
खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीवरून अकोला लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले. खासदार विनायक राऊत आणि बाळापूर विधानसभा आमदार नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे काल माझ्याविरुद्ध अकोला रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी झाली असा आरोप खासदार भावना गवळींनी केला.
दरम्यान, घोषणाबाजी करणाऱ्यांच्या मुलीबद्दल पत्नीबद्दल कोणी अशा घोषणाबाजी दिल्या असत्या, व्यक्तव्य केल असतं, हिन दर्जाचे वागणूक दिली असती. घाणेरडे बोलले असते, काल अकोला रेल्वे स्थानकावर घडलेला प्रकार म्हणजे त्यांची कृती पाहली असती तर अत्यंत तुच्छ कृती होती. जर अशा प्रकारे कृती त्यांच्या बहिणी आणि पत्नीबद्दल दिली असती, ते सर्व त्या ठिकाणी पहात उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळी यांनी उपस्थित केला असून या संदर्भात तक्रार लोहमार्ग पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली त्यानंतर आता हे गुन्हे दाखल झाले आहेत.