अकोला: येथील नामांकित जागृती माध्यमिक व उच्च महाविद्यालय येथे माजी विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य ऐतिहासिक मेळावा थाटामाटात संपन्न..
D.k.mandve 30 Oct 2022
अकोला : शहरातील नामांकित शाळा जागृती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,रणपिसे नगर अकोला या शाळेत 1983 ते 2015 या काळातील माजी विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आला, आमचे विद्यार्थी,आमचं वैभव,आमचा अभिमान दिनांक 29।10।2022 रोजी या मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ.रणजित पाटील माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य,मा.किरणराव सरनाईक शिक्षक आमदार तसेच जागृती विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.नितीन देशमुख बाळापूर विधानसभा आमदार,संस्थेच्या अध्यक्षा सौ.शांताताई धानोरकर संस्थेचे पहिले शाळा समितीचे अध्यक्ष मा.अशोकभाऊ मत्तलवार सचिव विलास वखरे,इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. रणजीत पाटील साहेब यांच्या हस्ते वसुधरचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रथमतः संस्थेचे मुख्याध्यापक मा.श्री.अरूण राऊत सर यांनी प्रास्ताविक सादर केले. यानंतर डॉ पाटील साहेब यांनी आपल्या भाषणात त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.माजी विद्यार्थी आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या भाषणात शाळेतील जुन्या आठवणी विषद केल्या,शिक्षक आमदार यांनी सुद्धा या निमित्ताने आपल्या भाषणात जोरदार शेरो शायरी करून सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.पहिल्या दिवशी जोरदार अंध विद्यार्थी यांनी बहारदार ऑर्केस्ट्रा सादर केला नंतर उपमुख्याध्यपक श्री.जळमकर सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचा पिटी चा क्लास घेतला .दुसऱ्या दिवशी दि.30।10।2022 रोजी कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला व यासोबतच पुढील वर्षीच्या मेळाव्याची तारीख दिनांक 19 नोव्हेंबर 2023 हि घोषणा सुद्धा केली. शाळेचे विद्यार्थी परदेशात अनेक चांगल्या वरिष्ठ पदावर आहेत, त्यासोबतच शाळेतील अनेक माजी विद्यार्थी राजकारण व समाजकार्य मध्ये सक्रिय आहेत तर बरेच विद्यार्थी हे अधिकारी सुद्धा आहेत काही विद्यार्थी व्यवसायात आपले नाव व या शाळेचे नावलौकिक वाढवित आहेत.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब मसने,कोषाध्यक्ष श्री.अशोकभाऊ मत्तालवार,सचिव विलास वखरे उपस्थित होते.या कर्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री राऊत सर,जळमकर सर,इंगळे सर,जुमळे सर,मांडवे सर,दिनू आमले माजी विद्यार्थी राहुल तांदळे,राहुल बोरचाटे व त्यांची चमू ,यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.दोनही दिवस स्नेहभोजनाचा आस्वाद सर्व माजी विद्यार्थी व कर्मचारी यांनी घेतला.
या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद दिला दोन्ही दिवस माजी विद्यार्थी भरपूर संख्येने जवळपास 500 ते 600 माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली,” भूतो ना भविशोतो” असा हा ऐतिहासिक जागृती विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा पार पडला.