INDIA NEWS

Press

अकोला:स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते पिंजर चे जिवरक्षक दिपक सदाफळे सन्मानित..

RaviRaj 16 August 2023

जिवरक्षक दीपक सदाफळे यांचा अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते सत्कार..

पिंजर…18 जुलै 2023 रोजी रात्री मुर्तीजापुर तालुक्यातील खरप ढोरे व चिखली गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता आणी खरप ढोरे येथील गांवकरी व सरपंच यांनी माहीती दीली होती की बाजीराव उईके हे शेतकरी पुराचे पाणी शेतात घुसले यामुळे ते अडकलेले आहेत अशी माहिती गावकर-यांनी आप आपल्या परीने मुर्तीजापुर येथे कळविली   यावेळी तात्काळ दखल घेत मुर्तीजापुर उ.वि.अ.संदीपकुमार अपार सर व तहसीलदार शिल्पा बोबडे मॅडम यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करीता पाचारण केले होते तेव्हा क्षणाचाही विलंब न करता दिपक सदाफळे हे आपल्या टीमसह शोध व बचाव साहीत्य आणी रेस्क्यु बोटसह सकाळी 5:00 घटनास्थळी पोहचले.

तेथील परीस्थिती आणी माहीती घेऊन क्षणाचाही विलंब न करता यांनी रेस्क्युबोट पुरात टाकली व रेस्क्यु ऑपरेशन चालु केले.यात खरप ढोरे गावा पासुन एक की.मी.दूरवर  अडकलेल्या बाजीराव उईके नामक ईसमाला सुखरूप बाहेर काढले आणी पुराचे पाणी गावातील घरांमध्ये शिरल्याने अन्न धान्य अत्यावश्यक भांडीकुंडी साधन सामग्री वाहने, पाण्यात भिजुन गेले होते यावेळी    सर्व गावात गावक-यांना धीर देत समुपदेशन करत सहकार्य केले होते याचीच दखल घेत मुर्तीजापुर चे उपविभागीय अधिकारी मा.संदीपकुमार अपार सर यांनी जिल्हाधिकारी महोदयांना साहसी,धाडसी तत्पर केलेल्या कामाची माहीती पत्राद्वारे कळविली होती.याच प्रमाणे 23 जुलै 2023 रोजी अकोला शहरातील शिवसेना वसाहत मधील नाल्याच्या पुरात वाहुन जाणारे संतोष बांगर या वृद्धाला दिपक सदाफळे यांच्या टीम ने सुखरुप वाचविले होते.अशाप्रकारे जिवरक्षक दिपक सदाफळे हे आणी यांची टीम गेली 23 वर्ष झाले आपत्ती व्यवस्थापनात निरंतरसेवेत जिवरक्षक आणी सुरक्षा व सेवा देण्याचे सातत्याने ते कार्यरत असतात याच सेवेची दखल घेऊन आज मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती जिल्हाधिकारी कार्यालय अकोला चे सदस्य दिपक सदाफळे यांना _*आज स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर सकाळी  जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे जिल्हा पोलीस अधीक्षक आ.संदीपजी घुगे सर,जि.प.मुख्य कार्यकारी मा.वैष्णवी बी.मॅडम,मा.नि. उ.जि.अ.विजय पाटील सर, मा.उ.प.जि.अ.सचिन कलंत्रे सर,अ.जि.अ.आ.माचेवाड सर, जि.प.अ.सौ.संगीताताई अढाऊ या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी आदरणीय अजित कुंभार सर यांच्या हस्ते जिवरक्षक सेवेने सन्मानित करण्यात आले_ आज जिल्हा प्रशासनाने केलेला सन्मान हा आंम्हाला बळ देणारा आहे याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आंम्ही आभारी आहोत.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish