आकोलखेड येथे गाढव पशुपालक कौशल्य विकास प्रशिक्षण पशुपालकांना किटसह प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप..
lalit nagrale 15 Feb 2023
अकोट :
गाढव हे भोई समाजातील व्यक्ती पूर्वीपासून पालन पोषण करुन त्यांच्या पाठीवर रेती,माती,गोटे हे ओझे वाहून नेण्याचे काम करतात.गाढवांना वर्षातून एकदा धनुर्वाताचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे.गाढवीनीचे दूध हे सहा हजार ते बारा हजार रुपये लिटरने विकले जाते.त्याप्रमाणे आपणही तो व्यवसाय म्हणून करु शकता.गाढवांना इजा झाल्यास उपचार करणे हे गाढव पशुपालकाचे काम आहे. असे प्रतिपादन डॉ.प्रविण बनकर समन्वयक कौशल्य विकास प्रशिक्षण पशुविज्ञान संस्था,अकोला यांनी आकोलखेड येथील प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना केले.
अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील तंटामुक्ती कार्यालयात दुपारी १ वाजता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गाढव पशुपालकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला सरपंच दिगंबर पिंप्राळे,डाॅ.प्रविण बनकर,डॉ.कुलदिप देशपांडे,सोसायटीचे संचालक डॉ.प्रभाकर नगराळे,कृषी अधिकारी निलेशकुमार नेमाडे,सोसायटीचे माजी अध्यक्ष ओंकारराव टवलारे,ग्रा.पं.सदस्य अब्दुल जहिद अब्दुल शहिद,पंजाबराव भारसाकळे,गोपाल धुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.डाॅ.देशपांडे यांनी गाढव व इतर प्राण्यांना आहार कोणता द्यायचा,लसीकरण कधी करावे आदींसह विविध बाबींवर त्यांनी आपले विचार मांडले.सरपंच दिगंबर पिंप्राळे यांनी गाढव पशुपालकांना योग्य ते कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात योग्य ते मार्गदर्शन करावे जेणेकरून प्रत्येक गाढव पशुपालकाला चांगल्या पध्दतीने काम करता येईल असे बोलताना म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भारसाकळे यांनी केले.गाढव पशुपालकांना जखमेवर लावण्याची क्रीम,पट्टीच्या किटसह प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
गाढव पशुपालकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात शंकर भारसाकळे,जानराव माने,महादेव भारसाकळे,सतिष सुरजुसे,विजय भारसाकळे,वामन माहोरे,गोपाल भारसाकळे,संतोष कावनपूरे, भिमराव श्रीनाथ, सुनिल ढोके, वासुदेव श्रीनाथ,सुरेंद्र भारसाकळे,रोशन हरसुले यांच्यासह गाढव पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.