आकोलखेड येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी..
Lalit Nagrale 25 Feb 2023

अकोट :
तालुक्यातील आकोलखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त संपूर्ण गावातून सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला झाला.महाराजांनी मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकलेत परंतू एकाही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे नाव लिहिले नाही.सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काढलेल्या शोभायात्रेसाठी अथक परिश्रम घेतले.