अकोट-अकोला रस्ता अपघात व बियाणे मिळवण्याच्या प्रयत्नात झालेल्या मृत्यूला कोण जबाबदार ! प्रत्येकी 20 लाख रुपये द्यावे..अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा..
sagar Lohiya 12 june 2024
गेल्या काही दिवसापासून बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला असून बियाण्यांकरिता शेतकरी पूर्णपणे कासावीस झालेला आहे फोडाफोडीच्या राजकारणात सरकारकडून शेतकरी संपूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे.. एवढेच नव्हे तर विद्यमान आमदार खासदारांना सुद्धा शेतकऱ्यांशी काही देणे घेणे राहिल्याचे दिसत नाही..मान्सून सुरू झाला तरीही शेतकऱ्याला आवश्यक असलेली बियाणे सुद्धा सरकार उपलब्ध करून देऊ शकले नाही.. एवढेच नाही तर या निगरगट्ट सरकार व लोकप्रतिनिधी मुळे अकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याला बियाण्याकरिता बाहेर जिल्ह्यात जात असताना अपघातात आपला जीव गमावावा लागला.. तरीसुद्धा शासकीय यंत्रणांना जाग आली नाही लोकप्रतिनिधी तर लोकसभा त्यानंतर विधानसभेच्या समीकरणात गुंतलेले आहेत..भर उन्हात शेतकरी हा बियाणे उपलब्ध करण्याकरिता दहा- दहा तास तपश्चर्या करीत आहे परंतु या शेतकऱ्याच्या संघर्षाची कुणालाही कदर नाही.. त्याचप्रमाणे दहा वर्षापासून प्रलंबित असलेला अकोट अकोला रस्ता सुद्धा अपघाताला निमंत्रण आहे.. सरकारच्या या ढिसाळ नियोजनामुळे आज पर्यंत अनेक संसार उध्वस्त झाले ..अनेक परिवार रस्त्यावर आले कुणाचा भाऊ तर, कुणाचे पती, तर कुणाचा मुलगा असे अनेक जीव ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेले आहेत याला लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे व रणधीर सावरकर तसेच खासदार
धोत्रे हे सर्वस्वी जबाबदार आहेत..अन्यथा हा अकोट अकोला रस्ता दहा वर्षापासून प्रलंबित का आहे.. याची माहिती या दोन्ही आमदारांना कदाचित नसेल.. कारण भाजप सरकार मध्ये या आमदारांचे अस्तित्व हे शून्य आहे. याचे हे जिवंत उदाहरण म्हणजेच प्रकाश भारसाकळे आहेत..
शेतकऱ्यांच्या व जनतेच्या मतांची या आमदारांना गरजच उरली नाही.. अशी चर्चा दोन्ही मतदारसंघातील जाणकारांकडून व्यक्त होताना दिसत आहे..
त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा या निष्क्रिय आमदारांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे ..त्यामुळे या लोकप्रतिनिधींकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण असलेले रविराज मोरे यांनी शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मागण्यांसाठी उपोषणाचे हत्यार उपसलेले आहे.. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे तात्काळ मुबलक उपलब्ध करून द्यावे..
कोणत्याही रासायनिक खताची टंचाई शेतकऱ्यांना भासू नये..
बियाणे घेण्याकरिता बाहेर जिल्ह्यात जात असताना अपघातात मरण पावलेल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 20 लाख रुपये तात्काळ मदत देण्यात यावी.. त्यासोबतच..
अकोट अकोला रस्ता निर्माणाधीन असल्यापासून अपघातात मृत्यू पावलेल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात यावे व जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावे..
आकोट अकोला रस्ता हा मागील दहा वर्षापासून प्रलंबित का आहे त्याची कारणे समाज माध्यमातून जनतेसमोर जाहीर करावे..
ठेकेदारांच्या चुकामुळे किंवा इतर कोणत्याही शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा रस्ता जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवल्यामुळे संबंधितावर कोणती कठोर कारवाई केली हे जनतेसमोर जाहीर करावे..
दोशींवर आजपर्यंत झालेल्या अपूर्ण रस्त्यामुळे अपघातातील झालेल्या सर्व मृत्यूला जबाबदार धरून कोर्टामध्ये खटला चालवावा..
आणि सर्व शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत शेत रस्त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ..
अशा अनेक प्रकारच्या मागण्या शासनाने तात्काळ सात दिवसाच्या आत मंजूर कराव्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रविराज मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे..