आकोट चे युवा नेते शौर्य बोचे यांची पश्चिम विदर्भ महासचिव पदी नियुक्ती..
Salim Khan 23 January 2024
अमरावतीचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कर्तव्य तत्परतेच्या माध्यमातून अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अगदी तळागळातील जनमानसामध्ये ओळख निर्माण करून अमरावती मतदारसंघात जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण केलेले आहे तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचे अनेक लाभ पोहोचवण्याचे काम करीत असताना त्यांची एक वेगळी ओळख लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे..
असाच एक भव्य दिव्य कार्यक्रम युवा स्वाभिमान पार्टीच्या अंतर्गत महाराजस्व अभियान हा स्वाभिमान महोत्सव संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे 12 जानेवारी रोजी घेण्यात आला यामध्ये मोफत आरोग्य शिबिर मोफत डोळ्यांची तपासणी ,अपंग बांधवांना मोफत साहित्य वाटप ,विधवापरितक्त्या निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप असे अनेक उपक्रम एकाच छताखाली राबवली गेली आहेत.. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व लाभार्थी व असंख्य लोकांचा सहभाग बघायला मिळाला.. सोबतच युवा स्वाभिमान पार्टीच्या काही महत्त्वाच्या पदनियुक्तया देण्यात आल्या…
त्यामध्ये अनेक वर्षापासून युवा स्वाभिमान पार्टीशी नाळ जुळलेले अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील अतिशय धडाडीचे युवा कार्यकर्ते मनमिळाऊ स्वभावाचे शौर्य बोचे यांची पश्चिम विदर्भ महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली.. शौर्य बोचे यांना एवढी मोठी जबाबदारी देताना बोचे यांच्या कार्याची दखल घेत भविष्यात सुद्धा आणखी जास्त जोमाने शौर्य बोचे हे पक्ष वाढीसाठी काम करतील असा विश्वास व्यक्त करीत युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार व खासदार यांनी आवर्जून कौतुक केले.. तसेच अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून शौर्य बोचे यांच्यावर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडुन कौतुकांचा वर्षाव होत आहे…