अकोट : ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई..मोटर सायकल सह एकूण 240 रु.चा मुद्देमाल केला जप्त..
RaviRaj 25 May 2024
गेली काही अनेक दिवसापासून अकोट शहर पोलिसांचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे हे सपशेल अयशस्वी ठरले..या अगोदर अकोट सारख्या संवेदनशील शहरात कर्तव्य बजावून गेलेले पोलीस निरीक्षक कैलास नागरे, संतोष महल्ले, प्रकाश अहिरे सारखे गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक कायम ठेवणारे अधिकारी यांचा दबदबा एका मृत्यू प्रकरणामुळे टिकवून ठेवण्यात तपन कोल्हे हे असमर्थ ठरले.. त्यामुळे अकोट पोलीसांचा आत्मविश्वास हा गेल्या काही दिवसापासून कमी होताना दिसत आहे परंतु आज
दि २५/०५/२०२४ रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हददीत पोलीस पेट्रोलींग करत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक बातमी मिळाल्याने, प्रविण सोनोने यांचे अडगाव खु शेतशिवारातील फणसाच्या झाडाखाली काही ईसम पैश्याच्या हारजीतवर ५२ ताश पत्यावर तिन पानी परेल नावाचा जुगाराचा खेळ खेळत आहेत. अशा खात्री लायक बातमीवरून पंच व पो स्टाफसह ग्रामीण पोलिसांनी जुगार रेड केला असता आरोपी नामे १) अब्दुल आकीब अब्दुल आरीफ, वय ३१ वर्ष, रा. पणज ता. अकोट जि अकोला २) प्रविण किसनराव सोनोने, वय ४३ वर्ष, रा. अडगाव खु ता. अकोट जि ३) निळु वासुदेव गवई, वय ३८ वर्ष, रा. पणज ता. अकोट जि अकोला ४) दिलीप साहेबराव गवई, वय ३८ वर्ष, रा. अडगाव खु ता. अकोट जि ५) विनोद साहेबराव सोनोने, वय ४२ वर्ष, रा. अडगाव खु ता. अकोट जि. अकोला ६) वसीम शहा शब्बीर शहा, वय २८ वर्ष, रा. अडगाव खु ता. अकोट जि. ७) अब्दुल राजीक अब्दुल खालीद, वय ४० वर्ष, रा. पणज ता. अकोट जि अकोला यांचे जवळुन नगदी २२४०/रू व ५२ तास पत्ते तसेच ५ मोटरसायकली कि अंदाजे ३,५०,०००/रू असा एकुण ३,५२, २४०/रू चा मुददेमाल पंचासमक्ष ग्रामीण पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला व लेखी फिर्याद वरून पो स्टे ला अप नं २२२/२०२४ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला..
ही सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंग,अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, सहा. पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोउपनि प्रविण सोनवणे, पोहेकॉ शिवाजी सोळंके बनं ०३, पोहेकॉ हरिष सोनवणे बनं १७१७, पोकॉ वामन मिसाळ बनं १४१५, पोकॉ गोपाल जाधव बनं ८४१, पोकॉ सुनिल वैराळे बनं २१७७, पोकॉ नंदकिशोर नेमाडे बनं २०२४, पोकॉ पोकॉ शैलेश जाधव बनं १२८८ यांनी केली असून या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे किशोर जुनघरे यांनी ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे आत्मविश्वास प्रबळ केला असून संपूर्ण पोलीस दलामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम या कारवाईच्या निमित्ताने किशोर जुनघरे यांनी केल्याचे दिसते अशा बेधडक कारवाईचे कौतुक संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे..