अकोट : एचडीएफसी बँक समोरील अवैध पार्किंग व लक्झरी वाल्यांच्या दादागिरीमुळे एसटीचा मार्ग संकटात- नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांची मूकसंमती..
Salim Khan 14 July 2023
अकोट: मागील अनेक वर्षापासून हिवरखेड मार्गे जाणारी एसटी वाहतूक रेल्वे स्टेशन चौक ते हिवरखेड रोड वर जाणारी वाहतूक राजदे प्लॉट मार्ग रस्ता अतिक्रमांच्या विळख्यात सापडल्यामुळे व रस्त्यावर अनधिकृत पार्किंग असल्याने एसटी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला त्यामुळे एसटी वाहतुक लकडगंज मार्गे वळती करावी लागली.. आता एसटी बस स्टॅन्ड ते शिवाजी चौक रोडवर सुद्धा अवैध वाहतूक व रस्त्यावरच्या दुकानदारांच्या दादागिरीने संपूर्ण रस्ता हा अनाधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडलेला आहे बस स्टॅन्ड ते शिवाजी चौक पर्यंत अनेक दुकानांसमोर अगदी रस्त्यावरच वाहने उभी करण्याची स्पर्धा सुरू असते जणू काही रस्त्यावर वाहने उभी करणे ही एक प्रकारची फॅशन झाली आहे त्यामुळे बस स्टॅन्ड वरून अकोला रोड वाहतूक होण्याकरिता एकमेव असलेला रस्ता तो सुद्धा भविष्यात एसटीला बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणून नगर प्रशासन व पोलीस वाहतूक विभाग यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्यावरचे दुकानदार व वाहनधारकांवर कठोर कारवाई करून वळण लावणे गरजेचे आहे सोबतच याच रस्त्यावर एचडीएफसी बँक असून बँकेसमोर संपूर्ण अस्ताव्यस्त गाड्या ह्या पार्किंग केलेल्या असतात एवढेच नव्हे तर समोरच असलेले लक्झरी स्टॅन्ड वरील लक्झरी सुद्धा रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत पार्क करून जास्तीत जास्त सवारी घेण्याकरिता लक्झरी वाल्यांची चढाओढ सुरू असते यामध्ये रस्त्यावरून इतर सर्व लोकांना विशेषतः वाहनधारक महिलांना भरपूर मानसिक त्रास होतो व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच एचडीएफसी बँकेच्या अनधिकृत पार्किंग मुळे व अमोरासमोर नियमबाह्य उभे असलेल्या लक्झरी मुळे एसटीला सुद्धा मार्ग काढताना अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो त्यामुळे एस टी ड्रायव्हर सुद्धा संताप व्यक्त करतो अशा या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर नगर प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.. एखादी वाईट घटना घडल्यावरच नगर किंवा पोलीस प्रशासन हे कर्तव्याप्रती गंभीर होतील का ?? की अकोट नगर परिषद व अकोट शहर पोलीस हे जनसामान्याच्या समस्या सोडवण्यासाठी नाही तर लक्झरी मालकाच्या किंवा एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या वर्चस्वा-खाली काम करीत आहेत का ?? असे अनेक प्रश्न एसटी चालक व प्रवाशांकडून विचारल्या जात आहेत..