अकोट आयसीडीएस कार्यालयाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर-मदतनीस भरती करिता महिला एजंट कडून लाखो रुपयाची मागणी!तर अंतिम यादीवर अनेकांचा आक्षेप..
parmeshwar hatole 27 August 2023
अखेर महाराष्ट्रातील एकमेव अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येणारे वादग्रस्त व नेहमी चर्चेत असणारे भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले अकोट येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांचा मदतनीस भरती मधील खरा चेहरा जनतेसमोर आला आहे..
लहान बालकांचे भविष्य असलेल्या अंगणवाडी मधील मदतनीस भरतीमध्ये लाखो रुपयाची मागणी महिला एजंट मार्फत मागितल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.. तर भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील उमेदवार अंतिम यादीवर आक्षेप नोंदवत आहेत.. त्यामध्ये रंभापुर येथील सौ आरती गजेंद्र तायडे, सौ.कृष्णा श्याम सावरकर व वैष्णवी अंबुलकर आंबोडा, तसेच पूजा रामेश्वर मेंढे वडगाव सह अनेक उमेदवारांनी झालेल्या मदतनीस भरतीवर आक्षेप घेतला आहे तरी जि.प अकोला येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी कौलखेडे यांनी भरतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना भरतीमध्ये पारदर्शकता राहील याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते परंतु अकोट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडून सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत नसून त्याला केराची टोपली दाखवल्या जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा वचक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आकोट यांच्यावर राहिलेला दिसत नाही. त्यामुळे या विभागातील या प्रशासकीय गोंधळामुळे गोरगरिबांचे हक्क हिरावून घेण्याचे काम होत आहे तसेच मागील काळात खूप मोठी लोकसंख्या जि प सर्कल असलेले मुंडगाव येथील अंगणवाडी मध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार गरोदर मातेला देण्यात आला आहे त्याची चौकशी महिला बालकल्याण सभापती यांच्याकडून करण्यात आली परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही किंवा तात्काळ ठेकेदारावर कार्यवाही करून त्याला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची हिंम्मत जि.प.यांनी दाखविली नाही…
संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त अकोट तालुक्यातीलच गावात हा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार कसा आला या प्रश्नाचे उत्तर मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे अनुत्तरितच राहिलेला आहे यावरून अकोला जिल्हा परिषद या बालगोपालांच्या भविष्याप्रति किती उदासीन आहे हे स्पष्ट होते. या सततच्या वादग्रस्त प्रक्रियेला अकोट तालुक्यातील जनता कंटाळलेली असून या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता अकोट कार्यालयामध्ये काही पत्रकार मंडळी गेले असता सीडीपीओ राहुल वरठे हे कार्यालयात हजर नसून लिपिक गजानन चंदन त्यांनी पत्रकारांना सहकार्य न करता उलट पत्रकारांचा व्हिडिओ काढून दबाव आणण्याचे घाणेरडे कृत्य केले आहे याचाच अर्थ गेली आठ ते दहा वर्षापासून गजानन चंदन चे वर्चस्व अकोट कार्यालयामध्ये किती प्रबळ आहे हे या माध्यमातून सिद्ध झाले आहे पत्रकारांचा आवाज दाबण्याचे गंभीर कृत्य गजानन चंदन यांने केले आहे.. मागील आठ वर्षापासून गजानन चंदन याची बदली न होण्यामागचे कारणे शोधणे गरजेचे आहे ..तसेच त्याची नोकरी व्यतिरिक्त काही अन्य व्यवसायात आर्थिक गुंतवणूक तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यामुळे मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये अनेक शंका उपस्थित झाल्याने तात्काळ मदतनीस भरती स्थगित करण्याची मागणी संपूर्ण अन्यायग्रस्त उमेदवाराकडून होत आहे..