INDIA NEWS

Press

अकोट मतदार संघातील जनतेचा टाहो ! प्रवाशांचे हाल बेहाल..

salim Khan 15 June 2025

अख्ख्या महाराष्ट्रात अकोट मतदार संघ नवीन एसटी बसेस पासून वंचित

अकोट: विद्यमान आमदारांच्या मागणीला सरकारकडून केराची टोपली

अख्या महाराष्ट्रात सर्व मतदारसंघातील एसटी डेपोला नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत व त्या सुसाट रस्त्यावर धावत सुद्धा आहे परंतु या नवीन बसेस पासून एकमेव अकोट मतदार संघ वंचित राहिलेला आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल बेहाल होत असून “नवीन एसटी बसेस कधी मिळणार ” की मतदार संघाप्रमाणे भंगार बसेस मध्येच यापुढे खडतर प्रवास करावा लागणार “ अशा आक्रमक प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत..
महाराष्ट्र सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनेक प्रलोभने जनतेला दिली गेली होती त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिकीट, लाडक्या बहिणींना अर्धी तिकीट एस टी बस मध्ये सुरू केले होते यादरम्यान विधानसभा निवडणुकीत या योजनांचा भरभरून फायदा विद्यमान सरकारला झाला परंतु निवडणुका झाल्याबरोबरच या योजनांच्या अंमलबजावणी करिता उपयुक्त ठरणारे पुरेपूर साधने सरकार उपलब्ध करू शकली नाही सर्व योजनांचा विसर सरकारला पडला आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिकीट ,महिलांना अर्धे तिकीट यामुळे प्रवाशांची संख्या अतोनात वाढली परंतु एसटी बसेस ची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे दररोज अनेक बसेस भंगारत निघत आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल बेहाल होत आहेत बसची प्रवासी क्षमता ४० असुनही १०० च्या वर प्रवाशांना मजबुरीने प्रवास करावा लागत आहे बसेसचे नियमित वेळापत्रक नसल्याने गर्दीमुळे वादविवाद करून संघर्ष करीत बस मध्ये प्रवाशांना चढावे लागते ज्येष्ठ नागरिक व लाडक्या बहिणींना तर अक्षरशा रडकुंडीला येऊन प्रवास करावा लागतो अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

प्रवाशांच्या या आक्रमक भावनेचा विचार करून महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघातील आमदारांनी आपापल्या मतदारसंघात सरकारकडे पाठपुरावा करून अनेक नवीन एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत परंतु यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव असलेला अकोट मतदार संघ मात्र नवीन बसेस मिळवण्यापासून वंचित राहिलेला आहे विद्यमान आमदारांनी सुद्धा पत्राद्वारे बसेसची मागणी केली आहे परंतु त्या पत्राला सरकारकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे, मतदार संघातील अकोट व तेल्हारा डेपोला नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा कमी पडल्याची चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये सुरू आहे तसेच अकोट मतदार संघाची कोणतीच दखल सरकारकडून घेतल्या जात नाही की विद्यमान आमदार एसटी बसेस सारख्या चिल्लर विषयावर स्वतःचे वजन वापरू इच्छित नाहीत असा संशय सुद्धा अनेक प्रवाशांनी बोलून दाखवला त्यामुळे पुढील चार वर्ष तरी असाच खडतर प्रवास करावा लागणार आहे असे दुःख ज्येष्ठ नागरिक व लाडक्या बहिणींनी व्यक्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish