अकोट मध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय.! अनेक दिग्गजांचे हात खोलपर्यंत..
RaviRaj 22 Feb 2025
अकोट मध्ये खोटे कागदपत्र बनवणारी टोळी गजाआड

अकोट: बांगलादेशी रोहिंगे हा राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला आहे अनेक बांगलादेशी राज्यात अनेक ठिकाणी खोट्या कागदपत्रांवर स्थायिक झालेले आहेत असाच प्रकार अकोट तालुक्याच्या शेजारी असलेले अंजनगाव या तालुक्यात घडलेला आहे अनेक बांगलादेशी रोहिंगे खोट्या कागदपत्रांवर आधार कार्ड बनवून लाखोंच्या संख्येने स्थानिक समाजात वावरत आहेत असाच एक प्रकार पुन्हा अकोटला सुद्धा उघडकीस आला आहे एक आठवड्यापूर्वी शहर पोलीस स्टेशनला एफ आय आर झाल्याप्रमाणे अनेक खोटे कागदपत्रे बनवून जवळपास दोनशे तीनशे लोकांना फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये आरोपी सोपान नाचने, शेख रहीम शेख नझिर यांच्यावर भारतीय न्याय संहिता ३१८ (४) ३३६ (२) ३३६ (३)३४० (२) ३ (५) bns नुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये जन्म दाखला, टीसी, असे खोटे प्रमाणपत्र बनवल्याचे दोन्हीही आरोपींनी कबूल केले
त्याप्रमाणे तात्काळ या आरोपीची पोलीस कस्टडी संपवून जेलमध्ये रवानगी झाली या टोळीतील आणखी एक आरोपी रमजान शहा याला पोलिसांनी काल ताब्यात घेतले असता कोर्टाकडून तीन दिवसाचा पीसीआर मंजूर झाला आहे रमजान शहा याची कसून चौकशी सुरू आहे अजून किती आरोपी या टोळीमध्ये सक्रिय आहेत व या टोळीचे पाळेमुळे परराज्यात प्रबळ असल्याची पोलिसांना संशय आहे

यामध्ये खोटे कागदपत्रासह शासकीय अधिकाऱ्यांचे अधिकृत शिक्के आढळून आले रमजान शहा याचे कुख्यात दंगल आरोपी जाकीर शाह रशीद शाह याच्यासोबत घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत जाकीर शाह यांने सुद्धा अनेकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यामुळे जाकीर शाह याचा सुद्धा सहभाग या रॅकेटमध्ये असण्याची शक्यता आहे तसेच रमजान शाह वर सुद्धा यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे त्यामुळे या टोळीचा संपर्क संपूर्ण देशभरात पसरलेले असल्यामुळे अनेक आरोपी यापुढे समोर येण्याची शक्यता आहे या टोळीने अनेकांना खोटे कागदपत्र बनवून लाखोचा गंडा घातलेला असून कोणत्या स्वरूपाचे बनावट कागदपत्रे बनवून खोट्या शिक्याचा आधार घेऊन देशातील कोणत्या विभागात कुठे कागदपत्रांचा उपयोग झाला हे तपासाअंती निष्पन्न होईलच मात्र या टोळीचा मोरक्या अजूनही फरार असून अकोट सारख्या संवेदनशील शहरात आणखी एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे
मागील काळात गर्ल्स उर्दू हायस्कूल अकोट येथील शिक्षक नाजीर उल्ला पटेल यांनी दहा लाखाची फसवणूक करून एका बेरोजगार युवकाची नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून फसवणूक केली होती त्याविरुद्ध 2019 नाझीर उल्ला पटेल याच्यावर फसवणुकीचे गुन्हे 420 नुसार आकोट पोलीस स्टेशनला दाखल झाले होते यादरम्यान पटेल हा 20 दिवस सेंट्रल जेलमध्ये सुद्धा आरोपी म्हणून अटक होता या केस मध्ये आणखी अनेक खुलासे झाले ते म्हणजे नाझीर उल्ला पटेल यांनी बेरोजगार युवक यांच्याकडून पैसे उकळण्साठी वेगवेगळ्या शाळेचे वेगवेगळे नियुक्तीपत्र दिले एवढ्यावरच न थांबता अब्दुल अन्सार याला शाळेचा पगार सुरू झाला हे दाखवण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या सहीचे खोटे अप्रुव्हल सुद्धा देण्यात आले तसेच एका विद्यार्थ्याचा एकाच दिवशी दोन शाळेतील टीसी बनवण्याचा ऐतिहासिक विक्रम हा सुद्धा नाझीर उल्ला पटेल यांनी करून दाखवला त्यामुळे असे अनेक खोटे कागदपत्रे खोटे शिक्के बनवून यापूर्वी शिक्षक असलेला आरोपी नाझीर उल्ला पटेल याने पराक्रम गाजवलेला आहे

आज रोजी अकोट मध्ये सोपान नाचणे ,रमजान शहा यांनी अशाच प्रकारची लाखो रुपयांनी गंडा घालून अनेकांची फसवणूक केली आहे तसेच रमजान शाह याचा जवळचा मित्र असलेला जाकीर शाह रशीद शाह याने सुद्धा यापूर्वी असे खोटे कामे करून अनेकांना लुबाडले आहे त्यामुळे या प्रकरणात जाकीर शाह सह नाझीर उल्ला पटेल यांच्यावर सुद्धा संशय बळवलेला आहे यापुढे अकोट पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे