INDIA NEWS

Press

अकोट नगर परिषद चे भ्रष्ट अधिकारी अजून किती बळी घेणार! अवैध टाॅवर मुळे अनेकांचा जीव जातोय-कायदा व सुव्यवस्था फक्त गरिबांसाठीच..

RaviRaj 9 Jan 2023

मृत रियाज अली चा परिवार

अकोट: मधील मागील दोन दिवसापासून अनेक अपघातांची मालिका सतत सुरू आहे शहरातील अतिशय संवेदनशील भाग समजला जाणारा इस्तेखार प्लॉट मधील ईकरा हायस्कूल मागील प्रांगणात उभे असलेले अवैध मोबाईल टाॅवर संपूर्ण खुल्या स्थितीत असल्यामुळे इस्तेखार प्लॉटमधील रहिवासी रियाज अली याचा खुल्या टाॅवर मुळे दोन दिवसांपूर्वी अपघात झाला यामुळे पुन्हा एकदा अवैध टाॅवर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे इस्तेखार प्लॉटमधील रहिवासी रियाज अलीच्या निधनाने भरपूर आक्रमक झालेले दिसत आहेत

इस्तेखार प्लॉटमधील अवैध असुरक्षित असलेले टाॅवर

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी रियाज अली चा मृत्यू झाला या भागात अनेक दाट लोक वस्ती असून अगदी टॉवरच्या बाजूलाच ईकरा हायस्कूल असल्यामुळे टॉवर असलेल्या प्रांगणामध्ये शाळेतील सर्व मुले खेळत असतात त्यामुळे शंभर फूट उभे असलेले टॉवरला कोणतीही संरक्षण भिंत किंवा संरक्षक गार्ड नसून सर्व टॉवरचा इलेक्ट्रिक सप्लाय वायर खुल्या परिस्थितीत दिसून येत आहे लहान मुले सहजरीत्या टाॅवरमध्ये प्रवेश करू शकतात अशा अवस्थेत असून शाळेच्या भिंती लगत दाट वस्ती असलेल्या भागात अनेक काळापासून अवैध असलेले मोबाईल टाॅवर हे अकोट नगरपरिषद यांना माहिती सुद्धा नाही हे असुरक्षित असलेले अवैध मोबाईल टाॅवर वर्षानुवर्षापासून अकोट नगर परिषद चे टॅक्स स्वरूपात नुकसान करीत आलेले आहेत या टाॅवर कडून कोणतेही टॅक्स अकोट नगरपरिषद ला मिळत नाही उलट नगर प्रशासनाची परवानगी न घेता हे टाॅवर मनमानी स्वरूपात उभे आहेत

इकरा हायस्कूलच्या प्रांगणात असलेले अवैध टाॅवर

परंतु एखाद्या गरीब व्यक्तीकडे टॅक्स बाकी असल्यास नगर प्रशासन तात्काळ कठोर कारवाई करून राहते घराला सुद्धा सील ठोकण्यास मागेपुढे पाहत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत रियाज अलीप्रमाणे अजून किती लोकांचा नाहक बळी जाणार याला कोण जबाबदार ॽ

अकोट नगरपरिषद चे परवानगी नसलेले अवैध टाॅवर

नगरपरिषद च्या कर्मचाऱ्यांनी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे की नगरसेवक यांना या अवैध टॉवरची माहिती असूनही आमच्या मुलांच्या जीवाशी खेळ खेळतात का? भ्रष्टाचार एवढ्या बोकळलाय की आमच्या गरिबांच्या मुलांचा जीव पैशांपुढे एवढा स्वस्त झाला आहे का? असे अनेक प्रश्न व खंत मृत रियाज अलीच्या परिवारातून व्यक्त होत आहे नगर प्रशासन व नगरसेवक यांना वेगळ्या भाषेत सांगायची वेळ आली आहे यापुढे आमची सहनशक्ती संपली असून अवैध असलेले मोबाईल टॉवर तात्काळ हटवण्याची मागणी इस्तेखार प्लॉटमधील रहिवाशांनी केली असून मागणीची दखल नगर प्रशासनाने न घेतल्यास प्रशासकीय अधिकारी व नगरसेवक यांना वेगळ्या भाषेत आक्रमक भूमिका घेऊन नगरपरिषदेला घेराव घालीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक सलीम खान यांनी दिला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish