अकोट: नगरपरिषद माजी अध्यक्ष यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश..
अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर सुद्धा नगरपरिषद भ्रष्टाचारामध्ये सामील असल्याचे पुरावे मिळाले असल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होण्याची शक्यता..
Ravi Raj 2 Nov 2022
आकोट : साध्या भोळ्या माणसाच्या प्रतिमेवर लोकांची सहानुभूती प्राप्त करून थेट नगराध्यक्षपदी निवड झालेल्या हरिनारायण माकोडे यांनी बनावट ठराव जोडून तब्बल २ कोटी, ९७ लक्ष, १६ हजार रुपयांच्या कामांची प्रशासकीय मान्यता मिळविल्याने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द करून नगराध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका मुख्याधिकारी यांना दिले आहेत. या सुनावणी दरम्यानच आमदार भारसाकळे यांनी अस्तित्वातच नसलेल्या या बनावट ठरावाची पाठराखण करीत या कामांची मान्यता रद्द न करणे बाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना पत्र दिल्याने या गैरकृत्यात त्यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान माजी नगराध्यक्षां विरोधात येत्या तीन-चार दिवसात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे
परंतु विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या आशीर्वादानेच अकोट नगर परिषद माजी अध्यक्ष यांनी हा भ्रष्टाचार केला आहे परंतु जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ होईल का? विद्यमान आमदार भाजपा सरकार मधील असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून दबाव येईल का? तसेच अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून स्थगिती मिळवण्याची परंपरा व इतिहास राहिलेला आहे भ्रष्टाचार झालेली रक्कम प्रशासनाकडे तात्काळ वसूल होईल याची शक्यता कमी आहे असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत..