अकोट: पुंडा येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन… अकोला जि.प.अध्यक्षा प्रतिभाताई भोजने सहित अनेक सन्माननीय मंडळींची कार्यक्रमास हजेरी…
Ravi Raj. 13 Oct 2022
अकोट: आज आकोट तालुक्यातील पुंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य दिव्य अशा नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ जिल्हापरिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी अनेक सन्माननीय मंडळी जिल्हापरिषद कृषिसभापती पंजाबरावजी वडाळ, जिल्हापरिषद सदस्य संगीताताई अढाऊ , मा महिला व बालकल्याण सभापती शोभाताई शेळके , जिल्हाध्यक्षा प्रभाताई सिरसाट , आसेगाव बाजार येथील विद्यमान सरपंच निलेश नारे , आदी मान्यवरांसह शिक्षक वृंद आणि बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती