INDIA NEWS

Press

अकोट: राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची अकोट शहरातील ऐतिहासिक कार्यक्रमाला हजेरी…

Ravi Raj 27 Spt 2022

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले
मा. सुधाकर रावजी गणगणे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला जमलेला जनसमुदाय

अकोला: माननीय आ. माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांच्या 75 वा वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव बिलबिले मंगल कार्यालय येथे खूप मोठ्या स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दिग्गज सर्वपक्षीय नेते यांनी हजेरी लावली त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले सह अनेक माजी मंत्री माजी आमदार विद्यमान आमदार सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आज अकोट शहरांमध्ये श्री सुधाकर रावजी गणगणे यांच्या अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त आकोट वासियांना सुधाकर रावजी गणगणे यांचे जीवन कार्य बघायला मिळाले या कार्यक्रमाचे निमित्त साधून जनसमर्पित सुधाकर या पुस्तकाचे अनावरण महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले अकोट मतदार संघ व सुधाकर रावजी गणगणे यांचे अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे अकोट मतदार संघ हा विकसित करण्याचे खूप मोठे श्रेय हे सुधाकररावजी गणगणे यांना जाते गणगणे यांनी अकोट मध्ये बी एड कॉलेज ,डीएड कॉलेज, मराठी माध्यमाच्या शाळा ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे असे अनेक विकासात्मक कार्य सुधाकर रावजी गणगणे यांनी अकोट मतदार संघात करून एक इतिहास निर्माण केला आहे या त्यांच्या कार्याने आजही नवीन पिढीला ऊर्जा मिळत असून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. अकोट मतदार संघ हा आजही श्री सुधाकरराव गणगणे यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर व मुंबई येथे ओळखला जातो म्हणूनच त्यांच्या या अमृत महोत्सवाला शहरातील अथांग असा जनसमुदाय बघायला मिळाला की या कार्यक्रमाची नोंद ही महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतिहासात केली जाईल असा सूर अकोट वाशियांकडून होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish