अकोट रेल्वे स्टेशन वर पारध्यांचे वर्चस्व, तर एसटी डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्यांची मनमानी-अखेर प्रवाशांनी जायचे तरी कुठे! शासन दरबारी लोकांचे अस्तित्व शून्य..
RaviRaj 14 August 2023
अकोट : रेल्वे स्टेशन येथे भयावह व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे रेल्वे स्टेशनवर दिवसा किंवा रात्री येणारया गाडीमधून अनेक प्रवासी विशेषता महिला प्रवाशांना रेल्वे स्टेशन वरून प्रवास करताना रेल्वे स्टेशन वरील पारध्यांची दहशत निर्माण झालेली आहे.. पारधी लोकांनी जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनवर ताबा केलेला आहे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था ही सुद्धा पारधी लोकांनी ताब्यात घेतलेली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य या पारधी लोकांनी पसरवलेले आहे. तसेच रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांच्या किंवा महिलांना पैसे मागण्यासाठी अंधाराचा फायदा घेत अचानक स्पर्श करून भयावह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.. रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता व्हावी असे रेल्वे प्रशासनाला मुळीच वाटत नाही किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाला सुद्धा याचे काही देणे घेणे आहे असे दिसत नाही..
या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रवासी हा दहशतीखाली आला असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी बसने प्रवास करण्याचा प्रयत्न करतो परंतु एसटी बस चे सुद्धा ढिसाळ नियोजन व एसटी कर्मचाऱ्यांची उदासीनता, अरेरावी यालासुद्धा एसटी प्रवासी कंटाळलेला आहे यामध्ये अकोट एसटी प्रशासनाला प्रवाशांचे काहीही देणे घेणे राहिलेले नाही असे वातावरण बघायला मिळत आहे अनेक प्रवाशांचे हाल प्रवास करताना होत आहे वेळेचे व एसटी बसेस चे नियोजन कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव हा भोंगळ कारभार सतत पाहायला मिळतो ही सर्व जबाबदारी एसटी डेपो मॅनेजर अकोट यांची आहे परंतु डेपो मॅनेजर हे एसटी बसेस कमी आहेत वरिष्ठांनाही मागणी केलेली आहे अशा अनेक प्रकारचा वरिष्ठांवर ठपका ठेवून जबाबदारीतून मोकळे होताना दिसतात.
कर्तव्याप्रती कुणीही गंभीर नाही.. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यावर राजकीय प्रतिनिधी असो की वरिष्ठ अधिकारी किंवा सर्व शासकीय यंत्रणा व्यवस्था यांच्याकडून सतत अन्याय होत आहे.. त्यामध्ये अकोट अकोला रस्त्याचा प्रश्न असो की गांधीग्राम च्या पुलाचा प्रश्न रेल्वे स्टेशनचा प्रश्न असो की एसटीचा अशा सर्वच यंत्रणां कडून अकोट तालुक्यावर अन्याय केला जात आहे त्यामुळे तालुक्यातील जनता ही किती सहनशील आहे याचा प्रत्यय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना आलेला आहे… त्यामुळे कुणीही गंभीर पणे अकोट तालुक्याला घेत नाही व घेणारही नाही …काल-परवा पुण्यातील चांदणी चौक येथील उद्घाटनामध्ये नितीन गडकरी सह देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील लोकांची अभ्यास करण्याची वृत्ती व पुणेकरांची शासकीय यंत्रणांकडून काम करून घेण्याची पद्धत, विकासाकरिता गंभीर असलेला प्रत्येक पुणेकर याचे कौतुक केले असून महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार यांना पुणेकरांसमोर झुकावे लागते त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात.. त्यांच्या मागण्यांना कोणतीही टाळाटाळ करता येत नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे जलद गतीने विकसित होणारे शहर आहे.. परंतु अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनता यांना साध्या मूलभूत गरजांकरिता ताटकळत ठेवणे वेळ काढूपणा करणे अशा स्वरूपाची लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेकडून वागणूक दिली जात आहे..
एकीकडे नितीन गडकरी अकोला जिल्ह्यातीलच मुर्तीजापुर अकोला रस्ता ७२ तासात पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम करतात आणि दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील आकोट अकोला रोड मागील दहा वर्षापासून पूर्ण करू शकत नाही ही गोष्ट न पटणारी आहे तसेच पुण्यातील चांदणी चौक येथील जवळपास ८०० करोड खर्च करून एवढा मोठा पूल हा एका वर्षात पूर्ण केला जाऊ शकते आणि दुसरीकडे अकोट अकोला रस्ता जोडणारा मुख्य गांधीग्राम चा पूल हा ४ करोड खर्चूनही दोन महिन्यात वाहून जातो ही बाब किती हास्यास्पद असून हा संपूर्ण तालुक्यातील जनतेचा एक प्रकारचा अपमानच आहे. यावरून हे स्पष्ट होते की लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन मधील सर्व शासकीय यंत्रणा हे अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनतेला किती कवडीमोल व अस्तित्वहीन समजत आहेत.. आपल्या या लोकांसाठी लोकांचे राज्य असलेले लोकशाही देशात अकोट तेल्हारा तालुक्यातील जनतेपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन सुद्धा अजूनही मूलभूत गरजा पोहोचल्या नाहीत.. याला जबाबदार कोण ? अशे अनेक प्रश्न नवीन युवा पिढीसमोर निर्माण झालेले आहेत…