अकोट रेल्वेचा कारभार भोंगळ ! तिकीट नसल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ
Sanjay Shelke 22 July 2024
अकोल्याचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे हे निवडून आल्यापासून फक्त स्वतःचा सत्कार करून घेण्यात मग्न आहेत..पंढरपूर विशेष ट्रेन सुरू झाल्यानंतर त्याचा मोठेपणा व गाजावाजा करण्याची संधी अनुप धोत्रे यांनी सोडली नाही अकोला विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनुप धोत्रेंना मात्र अकोट अकोला रस्त्याशी काही देणे घेणे नसल्याचे दिसते सोबतच अकोट व तेल्हारा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे मार्ग याबाबतीत माजी खासदार संजय धोत्रे यांच्या निष्क्रियकार्यशैलीप्रमाणेच विद्यमान अनुप धोत्रे यांची सुद्धा उदासीनता दिसून येते..
त्यामुळेच अकोला ते खांडवा हा ट्रेन चा मार्ग अजूनही थंड बसत्यात असून पुढील पाच वर्ष सुद्धा अकोट करांना प्रवासांचे हाल सोसावे लागण्याची शक्यता आहे.. आज तर अकोट रेल्वेची हद्द झाली दुपारी तीन वाजता अकोट वरून अकोला जाणाऱ्या ट्रेन मध्ये प्रवाशांना संपूर्ण फुकट प्रवास करण्याची मुभा मिळाली कारण अकोट रेल्वे स्टेशनवर तिकीटच उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला अशा या रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज प्रवाशांपुढे तिकीट विक्री करणारे कर्मचारी हे हताश झाल्याचे निदर्शनास आले..
ही माहिती मिळताच इंडिया न्यूज चे संपादक रविराज मोरे हे तात्काळ अकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचले व सर्व प्रवाशांना समज देऊन प्रवाशांमधील निर्माण झालेला गोंधळ हा शांत केला व अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मोरे यांनी सर्व प्रवाशांना दिलासा मिळण्याकरिता स्वतः तीन वाजताच्या ट्रेन मध्ये अकोट वरून अकोल्यापर्यंत प्रवास केला त्यामुळे ट्रेनमधील शेकडो प्रवाशांनी रविराज मोरे यांचे आभार व्यक्त केले.. सोबतच रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराच्या बाबतीत आश्चर्य व्यक्त केले व अकोट वाशीयांच्या भावनांची कदर विद्यमान खासदार अनुप धोत्रे व आमदार प्रकाश भारसाकळे यांना नसल्याचे खंत पुन्हा एकदा अनेकांनी बोलून दाखवली
त्यामुळे आता पुरे झाले ! लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या आता येणार्या विधानसभेला होणार नाहीत विद्यमान उपऱ्या आमदाराला घरी पाठवण्याची ” हीच ती वेळ ” आता नाही तर पुन्हा कधीच नाही ” अशा संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांकडून उमटल्या आहेत..