अकोट : रामेश्वर स्मशानभूमी बांधकामाचा 50 लाखाचा निधी गायब!- संजय शेळके यांचे स्मशानभूमीतच आमरण उपोषण..
अकोट नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर रोडवरील रामेश्वर स्मशानभूमी सौंदर्यीकरण बांधकाम करणे करिता ५० लाखाचा निधी मिळाला होता परंतु स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण होणे आधीच मिळालेला ५० लाखाचा निधी अचानक नगर पालिकेमधून गायब झाला आहे त्याचा शोध तात्काळ घेण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते संजय शेळके हे रामेश्वर स्मशानभूमीतच ऐतिहासिक आमरण उपोषणास बसले आहेत… “सलाम त्यांच्या कार्याला”!…
RaviRaj 23 March 2023
अकोट : शहरातील दर्यापूर मार्गावर असलेल्या रामेश्वर स्मशानभूमीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. सदर काम अर्धवट स्थितीत असल्याने त्वरीत मार्गी लागावे यासाठी सामाजिक व संघ कार्यकर्ते संजय शेळके यांनी २२ मार्चपासून चक्क स्मशानभूमीतच आमरण उपोषण सुरू केले आहे. अशा प्रकारचे उपोषण आजपर्यंत इतिहासात घडलेले नाही व घडणार ही नाही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आपण अमृत महोत्सव साजरा करण्याचा खूप मोठा वाजा गाजा करीत आहोत परंतु एकीकडे आपण डिजिटल इंडिया मेक इन इंडिया अशा प्रकारचे अनेक विकसित योजना राबवतो आणि दुसरीकडे समाज हिताचा अत्यंत महत्त्वाचा भाग असनारा स्मशानभूमी चा विकास करू शकत नाही नगर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बुद्धीची किव येते की अत्यंत संवेदनशील असलेले विषय सुद्धा प्रलंबित ठेवण्यात आपण धन्य मानतो आपण इतक्या खालच्या स्तराला गेलो आहोत हे या निमित्ताने दिसून येते.
रामेश्वर स्मशानभूमीसाठी अकोट ‘नगरपालिकेमध्ये 50 लाखाचा निधी आला आहे. तरीही स्मशानभूमीच्या बांधकामावर अत्यल्प निधी खर्च करण्यात आला असून अंत्यविधीचे ठिकाण व इतर कामे जैसे थे अवस्थेत आहे. त्यामुळे अंत्यविधी करतांना नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे….
तसेच या विवादित स्मशानभूमीचे कंत्राट हे सुनील अंबडकार यांनी घेतले होते परंतु त्यांना स्मशानभूमीचे बांधकाम व सौंदर्यीकरण करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामध्ये नगरपालिका प्रशासनामधील आयुक्त, इंजिनियर, अकाउंटंट, स्थानिक नगरसेवक व विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे या सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून अनेक वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणून व ब्लॅकमेल करून बांधकाम स्थगित करण्यासाठी त्रास देण्यात आला सुनील अंबडकार यांनी बांधकाम पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न केला असून सत्तेतील हपापलेले लोकप्रतिनिधी समोर अंबडकार यांचे हात टेकले व त्यांचे नगर प्रशासनाकडून सात लाख रुपये चे बिल हेतू पुरस्कार थकवण्यात आले. स्मशानभूमीच्या बांधकामांमध्ये अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण अकोट शहरांमध्ये होत असताना दिसत आहे ही अकोट वासियांकरता दुर्दैवाची बाब आहे.
रामेश्वर स्मशानभूमीशी शहरातील 60% भाग जुळलेला असल्यामुळे सदर स्मशानभूमीत दररोज अंत्यविधी पार पडतोच मात्र अकोट दर्यापूर मार्गावर असलेल्या या स्मशानभूमीच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मध्यंतरी आ. प्रकाश भारसाकळे यांनी याठिकाणी भेट देवून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना बोलावून सदर कामे त्वरीत पार पाडण्याचे आदेशित केले मात्र त्यानंतर मुख्याधिकारी बदलले व काम थंडबस्त्यात पडले. अशी परिस्थिती लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते संजय शेळके यांनी गुढीपाडव्यापासून स्मशानभूमीत आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. नगरपालिकेच्या “ढीसाळ “कारभारामुळे रामेश्वर स्मशानभूमीचे काम रखडले असून ते त्वरीत पुर्ण करावे. व कामाचा दर्जा तपासून, चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,
तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय शेळके यांनी लोकप्रतिनिधी स्थानिक अधिकारी व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही या समाज हितोपयोगी स्मशानभूमीच्या बांधकामांमध्ये कुणालाच इंटरेस्ट नाही जिल्हाधिकाऱ्यापासून तर आयुक्तापर्यंत सर्व एकमेकांना वाचवण्याचा व भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न सतत करीत आहेत असा आरोप संजय शेळके यांनी केला आहे शेळके यांचा उद्देश फक्त आणि फक्त अनेक वर्षापासून प्रलंबित व अपूर्ण स्थितीत असलेली स्मशानभूमी चे विकासात्मक सौंदर्यीकरण होणे हाच आहे स्वतःच्या हिताकरिता प्रत्येक जण हा सतत आयुष्यभर झटत असतो परंतु अशा समाज हिताकरिता झटणारे एकमेव व्यक्तिमत्व असणारे संजय शेळके यांनी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सर्व तालुक्यातील जनतेला केलेले आहे आणि प्रशासनातील निर्दयी कठोर व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे अधिकारी यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होऊन तात्काळ बांधकाम पूर्ववत व्हावे अशी मागणी शेळके यांची आहे. दरम्यान उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, प्रहारचे कार्यकर्ते व अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी सहानुभूतीपूर्वक भेटी देवून शेळके यांना पाठींबा जाहीर केला आहे.नगर प्रशासनाने या उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्यास याचे पडसाद व स्वरूप येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात दिसेल हे नक्की..