INDIA NEWS

Press

अकोट शहर पोलीस एएसआय विजय खेकडे वर कारवाई कधी ! सहा महिन्यापासून फक्त पत्रांचा खेळ सुरू..

salim Khan 7 July 2024

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल…

मागील सहा महिन्यापासून अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन मधील कस्टडी डेथ प्रकरण महाराष्ट्रभर गाजले त्यामुळे अकोट पोलिसांवर कायम संशयाने बघितल्या जात आहे..त्यामध्ये पुन्हा काही छोट्या-मोठ्या घटना सतत घडत आहेतच कस्टडी डेथ प्रकरणात तर एक कॉन्स्टेबल व पीएसआय सेंट्रल जेलमध्ये सुद्धा जाऊन आले आहेत व चार पोलीस कर्मचारी अजूनही फरार आहेत.. त्यामुळे आजपर्यंत अकोट व अकोला पोलिसांच्या इतिहासात अशा प्रकारची घटना घडली नसेल..हे प्रकरण शांत होत नाही तोच पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे..

तो म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये साई कम्प्युटरचे मालक मनीष राव यांचा व्यवसाय बंद करण्याच्या हेतूने अकोट येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय मधील आठ वर्षापासून एकाच कार्यालयात सतत कार्यरत असलेले लिपिक गजानन चंदन व पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांनी अनेक कट कारस्थाने रचल्याचा आरोप करीत मनीष राव यांनी 27 फेब्रुवारी 2023 ला अकोट शहर पोलीस स्टेशनला पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार व लिपिक गजानन चंदन यांच्या विरोधात रीतसर तक्रार दिली होती.. परंतु त्या तक्रारीची दखल न घेता स्टेशन डायरीवर कार्यरत असलेले एएसआय विजय खेकडे यांनी लिपिक गजानन चंदन व

पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांच्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही होऊ नये म्हणून मनीष राव यांची तक्रारच गहाळ करून टाकली त्यामुळे तक्रार गहाळ करण्यामागे नेमके कारण काय? हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.. एएसआय विजय खेकडे याच्यावर वरिष्ठांचा दबाव होता का ? की तक्रारीत नमूद रविराज मोरे यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या बातमीमुळे मोरे यांच्यावर वचपा काढण्यासाठी सर्वानुमते केलेले कटकारस्थान तर नाही ना ? असे अनेक प्रश्न गेली सहा महिन्यापासून अनुत्तरीत आहेत..

या सर्व संशयास्पद कार्यपद्धतीला विराम देण्यासाठी अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी ए एस आय विजय खेकडे यांचा कसुरी अहवाल सहा महिन्यापूर्वीच पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवला..परंतु अजूनही विजय खेकडे यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही बच्चन सिंग यांनी केलेली नाही.. उलट विजय खेकडे यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाला मागितला असता अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडे कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे असे माहितीचे अधिकारात उघड झाले आहे..

यावरून विजय खेकडे यांच्यावर कार्यवाहीची टाळाटाळ ही पोलीस अधिक्षकांकडून सहा महिन्यापासून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे ..त्यामुळे पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांच्या कडून पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार ,लिपिक गजानन चंदन व एएसआय विजय खेकडे अशा तीन कर्मचाऱ्यांच्या त्रिकूट असलेल्या प्रकरणात कोणत्या दबावाखाली कार्यपद्धती राबवली जात आहे हे मात्र अस्पष्ट आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish