अकोट: शहरातील मुख्य नाल्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेकांचे अतोनात झालेले नुकसान… जाकीर शाह रशीद शाह व रमजान शाह हसन शाह यांची तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी……
13 spt 2022
अकोट: मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे व अचानक आलेल्या महाभयंकर पाऊस यामुळे शहरातील प्रभाग क्रमांक १ प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ३ या तीनही प्रभागामधून मुख्य नाला चा प्रवाह जातो त्यामुळे पावसाचे कमी वेळात अचानक जास्त आलेले पाणी व सोबतच साचलेले सांडपाणी यामुळे प्रभागातील सर्व घरांमध्ये पाणी तुंबलेले असून सोबतच पाण्याच्या प्रवाहामध्ये घरातील अत्यावश्यक वस्तू ह्या वाहून गेल्या आहेत व प्रभागामधील शासलेल्या या घाण सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत लहान मुले व महिला मंडळींना डेंगू मलेरिया सारखे बिमारी लागण्याची शक्यता नकारता येत नाही त्यामुळे प्रभागातील जाकीर शाह रशीद शाह रमजान शाह हसन शाह व मोहम्मद शफीक पटेल यांनी अनेक कार्यकर्त्यांसह पुढाकार घेऊन उपविभागीय अधिकारी अकोट यांना सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी असे निवेदन दिले आहे…